You are currently viewing कागदाचा हुंकार

कागदाचा हुंकार

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कागदाचा हुंकार*

 

पांढऱ्या कागदावरती शांततेची रेघ होती

शब्दांच्या प्रतीक्षेत एक कहाणी दडली होती

 

शाईच्या प्रत्येक थेंबात

जिव्हाळ्याचा स्पर्श होता

मनातील गोंधळाला मोकळा श्वास मिळत होता

 

कधी अश्रूंची ओल कधी हास्याची झुळूक

कागदावर उमटते जीवनाची प्रत्येक झलक

 

निःशब्द असला तरी बोलतो तो खोलवर

कागदाचा हुंकार पोचतो थेट अंतःकरणावर

 

आठवणी काळाच्या ओघातही

जपून ठेवतो

आपल्या प्रत्येक क्षणाचा

कागद साक्षीदार असतो

 

लेखिका/ कवयित्री

संगीता कुलकर्णी– ठाणे@

9870451020

प्रतिक्रिया व्यक्त करा