“९५ दिव्यांच्या तेजोमय आरासीत शारदा धुरी यांचा वाढदिवस साजरा”
सावंतवाडी
कोकणातील नामवंत भजनी बुवा स्व. सदाशिव लाडू धुरी यांच्या सुविद्य पत्नी गं.भा. शारदा सदाशिव धुरी यांचा ९५ वा वाढदिवस गुरुवार दि. २६ मार्च २०२६ रोजी अत्यंत मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला.
या अभिष्टचिंतन सोहळ्याला नातेवाईक, आप्तस्वकीय, इष्टमित्र मंडळी तसेच मुंबईकर मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रेम, आपुलकी आणि आदराने भरलेल्या या सोहळ्याने सर्वांच्या मनात आनंदाचे वातावरण निर्माण केले.
यावेळी ९५ दिव्यांची तेजोमय आरास करून शारदाताईंना औक्षण करण्यात आले. उपस्थितांनी त्यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या मंगल प्रसंगी धुरी, सावंत व राणे परिवार आवर्जून उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम आनंददायी आणि संस्मरणीय ठरला.
