You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा शासनमान्य रोपवाटिका मालक संघटनेची “सिंधुदुर्ग नर्सरी मेन्स असोसिएशन” नावाची संघटना स्थापन करण्यासाठी पार पडली प्राथमिक बैठक

सिंधुदुर्ग जिल्हा शासनमान्य रोपवाटिका मालक संघटनेची “सिंधुदुर्ग नर्सरी मेन्स असोसिएशन” नावाची संघटना स्थापन करण्यासाठी पार पडली प्राथमिक बैठक

*नियोजित संघटनेच्या अध्यक्षपदी श्री.विजय कालिदास उर्फ व्ही.के. सावंत यांची निवड*

सिंधुदुर्ग जिल्हा शासनमान्य रोपवाटिका मालक संघटनेची सिंधुदुर्ग नर्सरी मेन्स असोसिएशन नावाची संघटना स्थापन करण्यासाठी प्राथमिक बैठक काल दिनांक 28 डिसेंबर 2022 रोजी संध्याकाळी चार वाजता मराठा समाज सभागृह कुडाळ येथे संपन्न झाली. सदरच्या सभेच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ रोपवाटिका धारक आणि शेतकरी संघटनेचे नेते श्री पूर्णानंद नाईक होते. निमंत्रक श्री उमेश येरम यांनी उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर सभा सुरू करण्यात आली. यावेळेस सभेच्या अध्यक्षस्थानी पूर्णानंद नाईक यांची निवड करावी असे श्री हरिश्चंद्र कदम यांनी सुचविले त्यास सर्वांनी अनुमोदन दिले व सभेच्या कामकाजास सुरुवात झाली. या नियोजित संघटनेचे अध्यक्ष म्हणून श्री.विजय कालिदास उर्फ V.K. सावंत यांची चर्चेअंती एकमताने निवड करण्यात आली.श्री.विकास म्हाडगुत यांची उपाध्यक्षपदी तर श्री.उमेश येरम यांची सेक्रेटरी पदी निवड झाली.सह सचिवपदी श्री.अर्जुन मोरजकर तर खजिनदार पदी श्री.दीपक आंगणे यांची निवड करण्यात आली.कार्यकारिणी सदस्य म्हणून सर्वश्री विनायक दळवी,बला आमडोस्कर,आदर्श मोरजकर,शिवराम आरोलकर,गणेश राणे,नंदकिशोर गावडे, बाबू काळे आणि श्री प्रभाकर सरवटे यांची एकमताने निवड झाली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकृत रोपवाटिका धारक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन त्या सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे ठरविण्यात आले.तसेच दर्जेदार नाविन्यपूर्ण कलमे रोपे निर्माण करून जिल्ह्याच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याचे धोरण ठरविण्यात आले.या प्रसंगी सुमारे एंशी रोपवाटिका धारक शेतकरी उपस्थित होते.सभेच्या शेवटी कै.परमानंद परब, कै.दादा नाईक सर तसेच इतर न्यात अज्ञात मृत नातेवाईक, संबधीताना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा