You are currently viewing भूपाळी

भूपाळी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*भूपाळी*

——————–

 

आकाशी चांदण्यांचा हा विझू लागला थाट

उठी श्रीरामा,निशा संपली झाली भली पहाट

 

शरयूवरून वाहती,चैत्राचे शितल वारे

निरोप लागले घेऊ, नभांगणीचे तारे

भक्तगण सारे जमले झाली गर्दी केव्हढी दाट

उठी श्रीरामा निशा संपली झाली भली पहाट

 

चंदनगंधित उटी समोरी मुखप्रक्षालन करा

गोरस घेऊन उभी जानकी प्याला हाती धरा

कूजन करण्या अधीर झाली, बघा मांडला पाट

उठी श्रीरामा रात्र संपली झाली भली पहाट

 

नगरवासीनी गर्दी केली जयकार केव्हढा झाला

पितांबर ते कटी लेऊंनी गळ्यात माळा घाला

झडे नगारा, सनई वाजे गाऊ लागले भाट

उठी श्रीरामा निशा संपली झाली भली पहाट

 

श्रीनिवास गडकरी

रोहा पेण पूणे

@ सर्व हक्क सुरक्षित

केवळ नावासहितच पुढे पाठवावे

मोबाईल 9130861304

26.03.2026

प्रतिक्रिया व्यक्त करा