आयनोडे पुनर्वसन येथे रामनवमी, एकादशी सप्ताह व हनुमान जयंतीनिमित्त धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
दोडामार्ग :
आयनोडे पुनर्वसन येथील श्री देव भूतनाथ सातेरी पंचायतन देवस्थानाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री रामनवमी, एकादशी सप्ताह आणि हनुमान जयंती निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवांमुळे परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार असून, भाविक व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
रामनवमी विशेष कार्यक्रम
गुरुवार, २६ मार्च रोजी दुपारी १२ वाजता श्री रामजन्मोत्सव साजरा होणार असून, त्यानंतर १२.३० वाजता आरती व तीर्थप्रसाद, तर दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री १० वाजता श्री देव भूतनाथ प्रसादिक नाट्यमंडळ, आयनोडे यांच्याकडून ‘सिंह गर्जला रणी’ हे ऐतिहासिक नाटक सादर केले जाणार आहे.
एकादशी सप्ताह प्रारंभ
रविवार, २९ मार्च रोजी दुपारी १२ वाजता विविध भजन मंडळांच्या भजनांनी सप्ताहाची सुरुवात होईल. सोमवार, ३० मार्च रोजी सकाळी १० वाजता सप्ताहाची सांगता होणार असून, त्याच रात्री १० वाजता ‘न्यायाघरी अन्याय’ हा सामाजिक नाट्यप्रयोग रंगणार आहे.
हनुमान जयंती उत्सव
बुधवार, १ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता श्रींच्या चरणी श्रीफळ, प्रसाद व ओटी अर्पणाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर रात्री १२ वाजता ‘कालिका अवतार’ हा पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग सादर केला जाईल.
समारोप सोहळा
गुरुवार, २ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता हनुमान जन्म सोहळा पार पडणार असून, सकाळी ८ वाजता आरती व तीर्थप्रसादाने उत्सवाची सांगता होईल.
या सर्व कार्यक्रमांचे आयोजन श्री देव भूतनाथ सातेरी पंचायतन देवस्थान विश्वस्त समिती व आयनोडे पुनर्वसन ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
