You are currently viewing घेतांना पदरात कर विचार

घेतांना पदरात कर विचार

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*घेतांना पदरात कर विचार*

 

उभी राहिलीस कवितेसारखी

विनंती करायला कवितेसाठी

पाऊस पाडतायत बाहेर कवी

विषय न ठेवला *माझ्यासाठी*..1

 

उभी राहून *सावळ्या समोर*

पेचात टाकलेस *आज मला*

झोपली प्रतिभा लवकर आज

कशी उठवायची मध्य रात्रीला…2

 

लाडात येऊन पेचात टाकलेस

नाही तर म्हणू *शकत तुला*

करून मुखकमल बंद माझे

ऐकवशील कविता चार मला….3

 

आहेस मोठी धीराची कवयित्री

लिहितो चार ओळी तुझ्यावरती

समजू नकोस ती तुझी आरती

*होईल माझी बंद बोलती*….4

 

पाहून तुझा ग मस्त *मूड*

शेवटी रचल्या ओळी चार

पदर तुझा *भला मोठा*

घेताना पदरात कर विचार…….5

 

विनायक जोशी🖋️ ठाणे

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा