You are currently viewing ग्रामगीताचार्य सौ. ज्योती बन्सोड यांना: हिरकणी पुरस्कार प्रदान

ग्रामगीताचार्य सौ. ज्योती बन्सोड यांना: हिरकणी पुरस्कार प्रदान

नागपूर :(बबनराव आराख)

सौ. ज्योतीताई बन्सोड (पांगुळ) ग्रामगीताचार्य यांच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक तथा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन, अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड आणि थिऑसॉफिकल ऑर्डर ऑफ सर्व्हिस, नागपूर यांच्या वतीने जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृतिदिना निमित्त दिनांक १५ मार्च २०२६ रोजी आदर्श मंगल कार्यालय, शारदा चौक, नागपूर येथे दिग्दज मान्यवरांच्या हस्ते, ‘हिरकणी पुरस्कार’प्रदान करण्यात आला.

ग्रामगीताचार्य सौ.ज्योती बन्सोड यांच्या साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय कार्यामुळे हा मानाचा ‘हिरकणी पुरस्कार’ सन्मान मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

जागतिक दिन निमित्त, सौ. ज्योती बन्सोड यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून, त्यांंचाकडून यापुढेही साहित्य क्षेत्रात तसेच, समाजहित व राष्ट्रहितासाठी मोलाचे योगदान राहील,असे मत पुरस्कार स्विकारतांना त्यांनी व्यक्त केले.

सदर पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असून त्यांना सुध्दा विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा