You are currently viewing स्मृति भाग ३४

स्मृति भाग ३४

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग ३४*  

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

आपण आज *शङ्खस्मृतितील* काही वर्णन पाहू या . प्रथम अध्यायात ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य व शूद्र या चार वर्णांची कर्मप्रणाली वर्णित आहे . आज जन्माने ब्राह्मण म्हणून जन्मला असेल व शिपायाचे काम करत असेल व दुसरे काहीच करत नसेल तर काय वर्ण समजावा ? शेवटी सात्विक विचार—उच्चार आणि आचारा नंतर दैवीगुणसंपत्ती सुरु होते का ? हा ही विचार करुन पुढे आसुरी सम्पत्तीत वर्णिलेला क्रोध हा जर दैवीगुणसंपत्ती वर्धन वा जतन करण्याकरता वापरला गेला तर तो पुण्यप्रदच म्हणावा लागेल ना ? ठीक आहे . वर्णाश्रम पध्दती ही व्यवस्था आहे . भेदाभेद करण्यासाठी निर्माण झालेली प्रणाली नाही . आम्ही सारे अखंड भारतमातेचीच लेकरं ! परकीय राज्यातून आलेले सुध्दा या मातीची लेकरं संबोधली जात असतील तर आमच्या ऋषिंनी केलेले संस्कार व निर्माण केलेल्या संहिता वाईट असतील ? खचितच नाही !!! म्हणून या वर्णाश्रम पद्धतीच्या अध्यायात शेवटचा श्लोक येतो—

 

*वृत्त्या शूद्रसमास्तावद्विज्ञेयास्ते विचक्षणैः ।*

*यावद्वेन जायन्ते द्विजा ज्ञेयास्ततः परम् ॥*

बुद्धिमानांकडून जन्माने सगळे शूद्रच समजले जावेत ! पण त्यानंतर वेदाध्ययनाने जेंव्हा त्यांचा दुसरा जन्म होतो तेंव्हा त्यास द्विज जाणावे .

म्हणजे तोपर्यंत त्यांना द्विज जाणूच नये ! केवढे स्पष्ट वक्तव्य ? एक श्लोक आठवल्याशिवाय रहात नाही .

 

*जन्मना जायते शूद्रः संस्कारात्द्विजोच्चते ।*

*विद्याभ्यासी भवेत्विप्रः ब्रह्म जानाति ब्राह्मणः ॥*

जन्माला आलेले सगळे शूद्रच असतात . संस्काराने तो द्विज होतो . विद्याभ्यासाने ( ब्रेन ओरिएन्टेड लर्निंग बरं ! , ब्रेड ओरिएन्टेड नाही ! ) तो विप्र होतो . आणि जो ब्रह्म जाणतो ( नुसते जाणतोच असे नाही ! आपल्याला कळलेला देव समाजातील शेवटच्या माणसापर्यंत जो पोहोचवतो तो !! ) तो ब्राह्मण !!

आपण ” ब्रह्मानंदी टाळी लागली ” ही म्हण तर वापरतो , पण ब्रह्माचा आनंद काय असतो , हे कळल्याशिवाय ब्रह्म कसं कळावं !

🌹

आपल्या शरीरात

१)अन्नमय ,

२)प्राणमय ,

३)मनोमय,

४)विज्ञानमय आणि

५)आनंदमय

हे पाच कोश आहेत . आपण सहज म्हणतो की त्याची ब्रह्मानंदी टाळी लागली !! पण तो आनंद कसा असतो ? हे आपल्या उपनिषदांनी सांगितले आहे .

चांगला , वेदाध्ययन केलेला , आशायुक्त , दृढस्वभावी , बलवान अशा तरुणास ह्या सर्व पृथ्वीचे वित्तपूर्ण राज्य मिळावे , त्या योगे त्याला जो आनंद मिळतो तो १ मानुषानंद होय .

 

१००मानुषानंद=१मनुष्यगंधर्वानंद

१००मनुष्यगंधर्वानंद=१देवगंधर्वानंद

१००देवगंधर्वानंद=१चिरलोकपितरानंद

१००चिरलोकपितरानंद=१आजानदेवलोकानंद

१००आजानदेवलोकानंद=१कर्मदेवानंद

१००कर्मदेवानंद=१देवानंद

१००देवानंद=१इन्द्रानंद

१००इन्द्रानंद=१बृहस्पत्यानंद

१००बृहस्पत्यानंद=१प्रजापत्यानंद

१००प्रजापत्यानंद=१ब्रह्मानंद

 

अशा ब्रह्माचा साक्षात्काररुपी आनंद जो जाणतो त्याला कसलेही भय रहात नाही !! मी चुकीचे कृत्य केले वा मी पाप केले ! हे ही भय वा हा ताप त्याला रहात नाही !!

ही सर्व माहिती तैत्तिरीयोपनिषदात आहे . हे सर्व वाचल्यावर मी विचारच करत बसलो की पल्ला किती गाठायचा आहे !!!!!!! आपण कुठे आहोत ? ऋषि , संत , गुरु , ब्राह्मण ( ज्ञानार्थी हं , पोटार्थी नाही !! ) , मुनी , सन्यासी , शंकराचार्य , जपी , तपी , महाराज , ही जी त्या त्या क्षेत्रातील परमोच्च शिखरं असतात , त्यांनी काय केलं असेल ? कसे आचार—विचार—उच्यार केले असावेत !!!! कसे व्रतनियमादि वा यमनियमादिंचे पालन केले असेल ?? कारण मनुष्य जन्मानंतर मृत्यू , नंतर यमलोक , त्यात चित्रगुप्ताचे हिशोबानुसार यमयातना , त्या भोगल्यावर चौर्‍यांशी लक्ष योनी फिरुन मग नंतर मनुष्य जन्म ! मग मनुष्य जन्मात मोक्षाचे वाटेवर जाण्यासाठी काय काय करावे लागते !! हा ब्रह्मानंद काय केलं तर मिळतो ? कुणाला मिळतो ? पाप पुण्याचा हिशेब कसा ? ( आपल्याला जर नागपूर ते पुणे , हा जाण्याचा हिशेब करायचा तर चार दिवस लागतात ! ) हा विचार सहज डोकावतो . *मग पूर्णब्रह्म कसे असावे?* हे जो जाणतो तो ब्राह्मण !! *संतांची एक ओवी वर्णन केली तर प्रवचनकारास एका फ्लॅटचे पैसे मिळत असतील तर पूर्णब्रह्म कसं असावं !* ते जो जाणतो तो ब्राह्मण ! *दोन पुस्तके शिकून नोकरी व पेन्शनची सोय मरेस्तोवर होत असेल तर पूर्णब्रह्म तेवढंच समजावं का ?* आज महिना धकेल येवढे पैसे जरी आले ना तरी माणूस बोलायला लागतो ” मला कुणाची गरज नाही ? ” हे शूद्रत्व का मनुष्यत्व ? ब्राह्मण्य सोडाच ! माणूस रसातळीच पोहोचला आहे आज ??!! कठीण आहे सगळे !!

पुन्हा प्रश्न उभा राहतोच ! ऋषि वाईट असतील ? सांगणे येवढेच ऋषिंना विसरु नका हो कुणी ! नुसते विसरु नकाच पण आपणही ऋषि होण्याचा प्रयत्न करा .🙏🙏

विनंती इतकीच , सर्वच स्मृति वाचनीयच आहेत . वाचाल ना ? उद्या काही श्लोक पाहू .🙏🙏

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

 

 

*संवाद मिडिया*

 

*अभिनव उद्योग प्रबोधिनी आयोजित डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी प्रशिक्षण*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————

जग झपाट्याने बदलत चाललंय…🌐

टेक्नॉलॉजीमध्ये पण निरंतर प्रगती होत आहे..🤗

 

*काळाप्रमाणे आपणही बदलणार की नाही ?*🤔

 

*बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या व्यवसायाला अधिक सक्षम करा.*😇

 

👉 *खाद्य पदार्थ क्षेत्र* म्हणजे *फूड इंडस्ट्री* मध्ये डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी सध्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

 

👉डिहायड्रेशन पद्धतीचा अवलंब करुन आपण *रेडी टू कूक, रेडी टू इट तसेच पावडर, फ्लेक्स* या प्रकारात शेकडो प्रॉडक्ट्स बनवू शकतो.

 

👉 फळं, भाज्या, हंगामी पिके, मासे इत्यादी वस्तू अनेक कारणांमुळे बऱ्याच अंशी खराब होतात, वाया जातात, त्याचा पूर्ण वापर होत नाही.

 

👉 *डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी* वापरुन या सर्व वस्तूंचा जास्तीत जास्त उपयोग करता येईल, वर्षभर त्याचा लाभ घेता येईल.

 

👉 सध्या सर्वत्र डिहायड्रेटेड प्रॉडक्ट्स ना खूप मागणी आहे आणि या डिहायड्रेटेड प्रॉडक्ट्सची रेंज, आवाका पण खूप मोठा आहे.

 

👉 *सखोल प्रशिक्षण, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न याद्वारे डिहायड्रेशन व्यवसायात चांगली कामगिरी करु शकतो, भरघोस आर्थिक उत्पन्न मिळवू शकतो.*

 

👉 *अभिनव उद्योग प्रबोधिनी* ने 19-20-21 जानेवारी रोजी *कुडाळ* येथे 3 दिवसीय *डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी प्रशिक्षण* आयोजित केलं आहे.

 

👉 हे प्रशिक्षण पूर्णपणे प्रॅक्टिकल वर आधारित असून व्यवसायासाठी लागणारी सर्व माहिती यावेळी देण्यात येणार आहे.

 

👉 हे प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांनी कृपया *DHY* असा व्हॉट्स ॲप मेसेज *8767473919* या क्रमांकावर पाठवावा.

 

👉 हा मेसेज आपल्या ओळखीतल्या लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना व्यवसायासाठी प्रेरित करा, सहकार्य करा.

 

🛑 *टीम अभिनव*

8767473919

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 8 =