*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कविता बनून हवे पकडायला*
शब्द शिकवतात मला तरायला
कविता शिकविते मला जगायला
करून गोळा शब्द *दिलदार*
सन्मान देतो मी प्रत्येक शब्दाला…1
ठेवून तयाला योग्य *स्थानी*
नाही करीत मी कधी मनमानी
पाहून गुणवैशिष्ठ्ये प्रत्येकाची
सर्वांचे तो भरतो *लोचनी*……..2
शब्द हारातील स्थानासाठी
भावूक असतो शब्द सखा
कठीण असते त्याला देणे
भावही त्याचे मनासारखा………3
ओळखून महत्व त्या स्थानाचे
निवड करतो उचीत शब्दाची
तरीही बसतो रुसून एखादा
लाखोली वहात शेलक्या शिव्यांची4
सवय होता अशा *उपहारांची*
कातडी बनते मग गेंड्यासारखी
सांभाळत सर्कस हिंस्त्र पशुंची
मानसिकता ठेवतो जोकरसारखी..5
कवितेतून मी *समस्या* मांडतो
सांभाळून पथ्ये *लोक शाहीतील*
खळ खट्याकचा *ठेवून आदर*
भाषाही वापरतो *मर्यादाशील*..6
कविता शिकविते सत्य शोधायला
आरडी एक्स *बाहेर काढायला*
बुरखे घालून फिरतो दहशदवादी
*कविता* बनून हवे पकडायला.7
विनायक जोशी 🖋️ठाणे
मीलनध्वनी/9324324157
