You are currently viewing गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कन्यारत्न प्राप्तीचा आनंद; आर्यादुर्गा मातेच्या चरणी पाट अर्पण

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कन्यारत्न प्राप्तीचा आनंद; आर्यादुर्गा मातेच्या चरणी पाट अर्पण

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कन्यारत्न प्राप्तीचा आनंद; आर्यादुर्गा मातेच्या चरणी पाट अर्पण

वागदे येथील राणे कुटुंबाची आगळीवेगळी धार्मिक भेट; मंदिर ट्रस्टकडून समाधान व्यक्त

वागदे – कणकवली

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सौ. चंदना चंद्रहास उर्फ बबली राणे व त्यांच्या कुटुंबाला आठ दिवसांपूर्वी कन्यारत्न प्राप्त झाले. या आनंदाच्या निमित्ताने त्यांनी वागदे गावातील आर्यादुर्गा माता मंदिरात जाऊन देवीच्या चरणी एक आगळीवेगळी भेट अर्पण केली.
राणे कुटुंबाने स्वतःच्या घरातील लाकडी साहित्य वापरून सुतारांकडून बसण्यासाठी पाट तयार करून घेतला आणि तो आर्यादुर्गा मातेच्या चरणी अर्पण केला. मंदिरात वर्षभर विविध धार्मिक विधी पार पडत असल्याने, विशेषतः श्रावण सोमवार, नवरात्र उत्सव आणि बालिका पूजन यांसारख्या कार्यक्रमांमध्ये लहान मुलांना बसण्यासाठी ही उपयुक्त भेट ठरणार आहे.
गुढीपाडव्याच्या या शुभदिनी कन्यारत्न प्राप्त झाल्याच्या आनंदातून ही धार्मिक सेवा करण्यात आली असून, मंदिराचे पुरोहित यांच्याकडे हा पाट विधिवत अर्पण करण्यात आला.
या उपक्रमाबद्दल आर्यादुर्गा मंदिर ट्रस्टच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा