You are currently viewing अर्शदीप-आवेश, सुदर्शन आणि अय्यर यांच्या आश्चर्यकारक कामगिरीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेत पाच वर्षांनंतर एकदिवसीय सामना जिंकला

अर्शदीप-आवेश, सुदर्शन आणि अय्यर यांच्या आश्चर्यकारक कामगिरीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेत पाच वर्षांनंतर एकदिवसीय सामना जिंकला

*अर्शदीप-आवेश, सुदर्शन आणि अय्यर यांच्या आश्चर्यकारक कामगिरीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेत पाच वर्षांनंतर एकदिवसीय सामना जिंकला*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत विजयाने सुरुवात केली आहे. आफ्रिकन संघाचा पराभव करून मालिकेत १-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. मालिकेतील दुसरा सामना १९ डिसेंबरला गकबेराह येथे होणार आहे. गोलंदाजीत अर्शदीप सिंग आणि आवेश खान या जोडीने धुमाकूळ घातला. दोघांनी मिळून नऊ विकेट घेतल्या. पाच विकेट घेणाऱ्या अर्शदीप सिंगला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. या दोघांच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर साई सुदर्शनने पदार्पणाच्याच सामन्यात अर्धशतक झळकावून सामना संपवला. श्रेयस अय्यरनेही अर्धशतकी खेळी साकारली.

जोहान्सबर्गच्या न्यू वांडरर्स स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा संघ ११६ धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात टीम इंडियाने १६.४ षटकांत ११७ धावा करत सामना जिंकला. भारताने पाच वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या घरच्या मैदानावर एकदिवसीय सामन्यात पराभूत केले. टीम इंडियाचा शेवटचा विजय २०१८ मध्ये सेंच्युरियनच्या मैदानावर झाला होता. भारताला २०२२ मध्ये सलग तीन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले होते.

भारताच्या डावात २०० चेंडू शिल्लक होते. एकदिवसीय सामन्यांमध्ये चेंडू शिल्लक असताना दक्षिण आफ्रिकेचा हा दुसरा सर्वात मोठा पराभव आहे. यापूर्वी २००८ मध्ये नॉटिंगहॅममध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना इंग्लंडने २१५ चेंडू शिल्लक असताना जिंकला होता. त्याचवेळी, चेंडू शिल्लक असताना भारताचा हा चौथा मोठा विजय आहे. भारताने २०२३ मध्ये श्रीलंकेविरुद्ध २६३ चेंडू शिल्लक असताना, २००१ मध्ये केनियाविरुद्ध २३१ आणि २०१८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध २११ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला.

दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या ११७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला पहिला धक्का ऋतुराज गायकवाडच्या रूपाने बसला. चौथ्या षटकात पाच धावा काढून तो वियान मुल्डरचा बळी ठरला. तो बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर खेळपट्टीवर आला. अय्यरने आक्रमक वृत्ती स्वीकारली. त्यामुळे सुदर्शनला आरामात खेळण्याची संधी मिळाली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी केली. अय्यर १११ धावांवर बाद झाला. त्याला सामना पूर्ण करता आला नाही. अय्यरने ४५ चेंडूत ५२ धावांची खेळी साकारली. त्याने सहा चौकार आणि एक षटकार मारला. सुदर्शनने ४३ चेंडूत ५५ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याने नऊ चौकार मारले. तिलक वर्मा एक धाव काढून नाबाद परतला. दक्षिण आफ्रिकेकडून वियान मुल्डर आणि अँडिले फेहलुकवायो यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

साई सुदर्शन आपल्या पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात ५० किंवा त्याहून अधिक धावा करणारा भारताचा १७वा फलंदाज ठरला. पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात ५० किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो चौथा भारतीय सलामीवीर आहे. रॉबिन उथप्पाने २००६ मध्ये इंग्लंडविरुद्ध ८६ धावा केल्या होत्या. केएल राहुलने २०१६ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध १०० धावांची नाबाद खेळी खेळली होती. फैज फजलने २०१६ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद ५५ धावा केल्या होत्या.

भारताकडून अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांनी गोलंदाजीत कमाल केली. दोघांनी मिळून नऊ विकेट घेतल्या. अर्शदीपला पाच आणि आवेशला चार विकेट मिळाल्या. डावाच्या दुसऱ्या षटकातच अर्शदीप सिंगने लागोपाठ दोन चेंडूत दोन बळी घेतले. या षटकातील चौथ्या चेंडूवर अर्शदीपने रीझा हेंड्रिक्सला त्रिफळाचीत केले. चेंडू त्याच्या बॅटची बाहेरील कडा घेऊन विकेटवर आदळला. रिझाला खातेही उघडता आले नाही. यानंतर पुढच्याच चेंडूवर अर्शदीपने रसी वान डर डुसेनला पायचीत टिपले. त्याला खातेही उघडता आले नाही. अर्शदीपची हॅट्ट्रिकची संधी हुकली. टोनी डीजॉर्ज चांगल्या टचमध्ये दिसत होता, पण अर्शदीपने त्यालाही तंबूमध्ये पाठवले. अर्शदीपने टोनी डीजॉर्जला यष्टिरक्षक राहुलकरवी झेलबाद केले. त्याला २२ चेंडूत २८ धावा करता आल्या. यानंतर अर्शदीपने डावाच्या १०व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हेनरिक क्लासेनला (६) बाद केले.

अर्शदीपच्या भेदक मार्‍यानंतर आवेश खानची घातक गोलंदाजी पाहायला मिळाली. आफ्रिकेच्या डावातील ११व्या षटकात आवेश खानची हॅटट्रिक हुकली. त्याने पहिल्या दोन चेंडूंवर एडन मार्कराम आणि व्हियान मुल्डरला तंबूमध्ये पाठवले. त्यानंतर आवेशने डेव्हिड मिलरला यष्टिरक्षक राहुलकडे झेलबाद केले. मिलरला दोन धावा करता आल्या. यानंतर त्याने केशव महाराज (२५) याला आपला चौथा बळी बनवला. अर्शदीपला डावातील २६व्या षटकात पाचवे यश मिळाले. मैदानावर स्थिरावलेल्या अँडिले फेहलुकवायोला त्याने पायचीत टिपले. ४९ चेंडूत ३३ धावा करून तो बाद झाला. तर, कुलदीपने शेवटची विकेट घेतली. आवेश पाच विकेट घेऊ शकला नाही.

*संवाद मीडिया*

*रॉयल इस्टेट एजंट*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

*_🏡कोकणात फार्म हाऊस हवय…_*
*👉तर मग आमच्याकडे संपर्क साधा….*

*आमची खास वैशिष्ट्ये*👇

*▪️फळबागायतीसाठी जमीन खरेदी व विक्रीसाठी मदत*

*▪️पाणी व वीजपुरवठा असणारी जागा शोधून देणे*

*▪️जमिनीचे खरेदी व विक्रीसाठी आवश्यक दस्तऐवज तयार करून मिळतील*

*▪️वीज पुरवठ्याची कामे केली जातील*

*▪️फळबाग लागवड, पशुधन गाय व शेळी कुक्कुट पालन साठी सल्ला मिळेल.*

*▪️5 गुंठा ते 50 एकर पर्यंत क्लिअर टायटल प्लांट उपलब्ध*

*संपर्क*
*📲8928513279*
*📲9356724770*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118963/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा