You are currently viewing सेवा सोसायट्यांनी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन

सेवा सोसायट्यांनी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन

सेवा सोसायट्यांनी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

 सेवा सोसायट्यांना जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाचे शिफारस पत्र घेऊन नाव नोंदणी झाल्या आहेत. अशा सेवा सोसायट्यांना कामाची आवश्यकता असल्यास काम मिळण्यासाठीचे प्रस्ताव व दरपत्रक 25 मार्च 2026 रोजी सायं. 5 वाजेपर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालय येथे स्वहस्ते सादर करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार  व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे, सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे.

बेरोजगारांच्या सहकारी सेवा सोसायट्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यांच्या उद्देशाने रु. 10 लाख इतक्या रक्कमेची कामे विनानिविदा उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे शासन निर्णय अन्वये जिल्हा स्तरावर काम वाटप समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने काम वाटप समितीकडे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयाकडून कंत्राटी कामाकरिता पत्र प्राप्त झाली आहेत.

आवश्यक अटी व शर्तीच पूर्तता करणे अनिवार्य आहे. उशिरा प्राप्त झालेली तसेच अपूर्ण स्वरूपातील प्रस्ताव अपात्र ठरवून स्विकारण्यात येणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा