You are currently viewing विष्णू वाघ यांच्या समर्थकांची ८ रोजी पणजीत बैठक

विष्णू वाघ यांच्या समर्थकांची ८ रोजी पणजीत बैठक

पणजी

दिवंगत साहित्यिक विष्णू वाघ यांच्या समर्थकांची तसेच हितचिंतकांची बैठक शनिवार ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता पणजी येथील गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत वाघ यांच्या साहित्यावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या आयोजन समितीची निवड केली जाणार आहे.

यासंदर्भात बोलताना कोमपचे अध्यक्ष सुदेश आर्लेकर यांनी सांगितले, की विष्णू वाघ यांच्या समग्र साहित्यावर पणजी येथे नामवंत कवी अरुण म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली १५ ऑक्टोबर रोजी दिवसभर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राच्या आयोजनासाठी इन्स्टिट्युट मिनेझीस ब्रागांझाचे सहकार्य लाभले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विष्णू वाघ यांचे आतापर्यंत नऊ कवितासंग्रह तसेच नऊ नाटके व एकांकिकासंग्रह प्रकाशित झाले आहेत. चरित्रग्रंथ, अनुवादित लेखन या वाङ्‍मयप्रकारांतील त्यांचे लेखनही प्रकाशित झाले आहे. स्पर्धात्मक रंगभूमी गाजवलेल्या त्यांच्या मराठी व कोकणीतील मिळून सुमारे पन्नास नाट्यसंहितांपैकी अवघीच नाटके पुस्तकरूपाने आली आहेत. त्यांनी लिहिलेल्या सुमारे वीस मराठी-कोकणी एकांकिका रंगभूमीवर सादर झालेल्या आहेत. त्यांचे अप्रकाशित साहित्य पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्याबाबत कोकण मराठी परिषद पुढाकार घेणार आहे, अशी माहितीही सुदेश आर्लेकर यांनी दिली.

Advertisement

Web link

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + thirteen =