संदीप सावंत यांना “राष्ट्रीय गुणगौरव शिक्षण” पुरस्कार प्राप्त…

संदीप सावंत यांना “राष्ट्रीय गुणगौरव शिक्षण” पुरस्कार प्राप्त…

तळेखोल गावचे सुपुत्र व जि.प.प्राथमिक शाळा सासोली हेदूस येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले युवा कवी व साहित्यिक संदीप सुरेश सावंत यांना विध्यार्थी विकास प्रशिक्षण अकॅडमी, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र यांच्या वतीने शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल राष्ट्रीय गुणगौरव शिक्षण” पुरस्कार ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून ऑनलाईन मानपञाचे वितरण करून देण्यात आला.
राष्ट्रीय गुणगौरव शिक्षण, सामाजिक व कला-साहित्य सोहळा विद्यार्थी विकास प्रशिक्षण अकादमीच्या (रजि.) वतीने गुणीजन व विविध क्षेञात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या गुणवान व्यक्ती व संस्थाना हा पुरस्कार दिला जातो.
त्यांच्या शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रात केलेल्या कार्याचे मूल्यमापन संस्थेमार्फत करून त्यांना आकर्षक ऑनलाईन सन्मानपत्र देऊन गौरविण्यात करण्यात आला. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा