You are currently viewing महिला दिन व जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा 
Oplus_16908288

महिला दिन व जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा 

निगडी :

समर्थ नगर, निगडी येथील ॲम्पल मॉन्टेसरी प्रीस्कूल, डेकेअर अँड ॲक्टिव्हिटी सेंटर येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन व जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सौ. अंजू सोनावणे उपस्थित होत्या. त्यांनी महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी मार्गदर्शन केले तसेच कॅन्सरवर मात केलेल्या त्यांच्या प्रवासाबद्दल आणि रक्तदानाच्या महत्त्वाबद्दल सांगितले.

कार्यक्रमास सौ. शामली पडवळ, डॉ. शुभांगी सुपे, सौ. प्रतिभा देवकुळे व सौ. वसंताई हेगडे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन सौ. वर्षा गायकवाड व सौ. सायली भानसे यांनी केले. महिलांमध्ये उद्योजकतेची प्रेरणा देण्यात आली व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार आबोलीच्या रोपाने करण्यात आला.

टीचर ट्रेनिंगमधील शिक्षिकांनी फूड, ज्वेलरी व कॉस्मेटिक्सचे स्टॉल्स लावले होते. जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहक हक्कांविषयी जागरूकतेचा संदेश देण्यात आला. तसेच महिला व मुलांसाठी खेळ, पालकांचा महाराष्ट्रीयन व राजस्थानी वेशभूषेतील रॅम्प वॉक आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीविता हेगडे यांनी केले, तर तनिष्का घोबळे यांनी आयोजनात सहकार्य केले. दरम्यान, विद्यार्थ्यांनी समर कॅम्प, कॉम्प्युटर व रोबोटिक्स क्लासेसला उत्स्फूर्त प्रतिसाद देत डान्स व सिंगिंग स्पर्धांमध्ये बक्षिसे पटकावली.

प्रतिक्रिया व्यक्त करा