You are currently viewing मन:शांती

मन:शांती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*“मन:शांती”*

 

शांती शोधण्याचा मनुष्य करितो प्रयत्न

अशांततेत धुंडावे अंतरंगी स्थिर स्थानIIधृII

 

काव्य संगीत लेखन करावे वाचन

मिळते शांती एकाग्रता व्यासंगातून

आपोआप लाभते सर्वथा ऊर्जा चैतन्यII1II

 

सागर भरती ओहोटी राहे दिनरात

मनातील भावना येती उचंबळून

संयम ठेवावा मनी राखावे संतुलनII2II

 

मनाविरुद्ध घडते मानापमान

दुःख टाळून शोधावा आनंद सतत

कार्यरत राहावे नेक मिळे समाधानII3II

 

मनुष्य करितो अभिनय वेळेप्रमाणं

भूमिका निभावतो सुखदुःख लपवून

साधावा उत्कर्ष सकारात्मक राहूनII4II

 

दुःख राग लोभ असावा गळ्यापर्यंत

करू नये चेहऱ्यावर प्रदर्शन व्यक्त

सर्वां विषयी प्रेम असावे हृदयांतII5II

 

©️कवी.श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा