*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सांजवेळा*
〰️〰️〰️〰️
सुखदुःख वेदनां जरी भाळी
सारी सारी प्रारब्धाची खेळी
कां उगा कुणाला दोष द्यावा
आता सप्तरंगल्या सांजवेळी
आठवांच्या अवीट जलधारा
ओसंडूनीया वाहती ओंजळी
सारेसारे आता निमूट झेलीत
सत्कर्मी जगत रहावे प्रांजळी
हा क्षण तर बेभरोसी बुडबुडा
हरिहराला स्मरावे सर्वकाळी
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*©️वि.ग.सातपुते.(भावकवी)*
*९७६६५४४९०८*
