You are currently viewing श्री विजयकुमार पांचाळ यांना महाराष्ट्र शासनाचा “गुणवंत कामगार पुरस्कार” जाहीर

श्री विजयकुमार पांचाळ यांना महाराष्ट्र शासनाचा “गुणवंत कामगार पुरस्कार” जाहीर

मुंबई

आतंरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आयोजित कामगारांचा सन्मान सोहळा रामकृष्ण नाट्यगृह पिंपरी चिंचवड पुणे येथे पार पडला.यामध्ये शासनाच्या कामगार कल्याणासाठी अनेक कल्याणकारी योजनेचा शुभारंभ करण्यात आला.कामगारांसाठी महत्वाच्या योजना कोणत्या ,कामगार व कामगार कुटुंबीयांना आरोग्य ,शिक्षण या बाबतीत महत्वाचे मार्गदर्शन आदरणीय श्रीमती विनीता वेद सिंघल प्रधान सचिव कामगार विभाग यांनी कामगारांना केले..यावेळी कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा गुणवंत कामगार पुरस्काराच्या नावांची घोषणा केली. यामध्ये बडवे इंजिनिअरिंग नायगव्हाण खांडेवाडी युनिट २ मधील श्री विजयकुमार रामराव पांचाळ यांची सन २०२१ २०२२ या वर्षीच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असे महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आदरणीय श्री सुरेश (भाऊ) दगडु खाडे यांनी जाहीर केले.. दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातुन फक्त ५१ कामगारांना हा शासनाचा पुरस्कार देण्यात येतो..श्री विजयकुमार रामराव पांचाळ यांचे मुळगाव मु.पो.बेटसांगवी ता.लोहा जि.नांदेड आहे..परंतु आई आरोग्य खात्यात माजलगाव येथे कार्यरत असल्यामुळे प्राथमिक शिक्षण मंजरथ, तालखेड येथे व महाविद्यालयीन शिक्षण माजलगाव महाविद्यालय येथे झाले. शालेय जिवनापासुनच लिखाणाची वाचनाची आवड होती कवीता लिहणे , पुस्तके कादंबरी वाचणे हीच सवय पुढे जपली… विद्यार्थी असतानाच SFI विद्यार्थी संघटनेदवारे चळवळीत सक्रीय नेत्रत्व पुढे आले. विद्यार्थांचे प्रश्न, वसतीगृहातील विद्यार्थांच्या समस्या , विकासनिधीच्या नावाने विद्यार्थी व पालकांची केली जाणारी लुट थांबवण्यासाठी रस्ता रोको आंदोलन, मोर्चा याव्दावारे संघर्ष करुन शालेय विद्यार्थी यांना न्याय मिळवुन दिला.सन २००० साली भारतीय संसदेवरती संपूर्ण भारतातुन विद्यार्थांचा मोर्चा काढण्यात आला होता त्यामध्ये सक्रीय सहभाग होता.महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सन २००१ साली बडवे इंजिनिअरिंग या कंपनीत कामास सुरुवात केली ती आजपर्यंत आनंदी वातावरणात, प्रामाणिकपणे चालु आहे.कंपनीत अनेक KAIZEN करुन उत्पादन वाढ ,कामगारांची सुरक्षा,cost reduction, Quality improvement याबाबत सुधारणा केल्या आहेत.भारतातील नामांकित शासकीय निमशासकीय संस्थाकडुन CII,ACMA, NCQC QCFI,BAVA यांच्याकडून उत्कृष्ट कार्य व सादरीकरणासाठी अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळवले आहेत.. जागतिक महिला दिन, प्रजासत्ताक दिनी, स्वातंत्र्य दिनी, कामगार दिनी, राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त इत्यादी सर्व कार्यक्रमात सुत्रसंचलन तसेच मागदर्शन उत्तमरित्या करतात.बडवे इंजिनिअरिंग ग्रुपचे बेस्ट क्रिकेट समालोचक म्हणुन प्रत्येक वर्षी सन्मानीत करण्यात येते. उत्कृष्ट लेख, कवींता लिहुन साहीत्यीक श्रेत्रातील सुप्रसिद्ध कवी म्हणून प्रख्यात आहेत. हे अश्रू कोणाचे ही कवींता मराठवाडा विभागातुन प्रथम आली आहे व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या आयोजित राज्यस्तरीय संमेलनात त्यांचा आदरणीय जेष्ठ साहित्यिक श्री रामदास फुटाणे श्री अशोक नायगावकर श्री प्रंशात मोरे श्री गणेश चंदनशिवे कवीत्री निरजा यांच्या उपस्थितीत कामगार कल्याण मंडळाचे महाराष्ट्र कामगार आयुक्त श्री रवीराज ईळवे सरांनी बक्षीस,मानचिन्ह देवुन मुंबई येथे सन्मान करण्यात आले आहे.अनेक राज्यस्तरीय काव्य पुरस्कार त्यांना आत्तापर्यंत मिळाले आहेत.परंतु महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा गुणवंत पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्याची खरी पावती मिळाली आहे. भारतीय कामगार सेना बडवे इंजिनिअरिंग युनिटचे उपाध्यक्ष, युनिट संघटक कामगार प्रतिनिधी म्हणून सक्रीय पणे कार्यरत आहेत. कामगारांचे आत्तापर्यंत सहा वेतनवाढीचे करार आनंदी वातावरणात पार पाडले आहेत. कंपनी व्यवस्थापन व युनीयन यांच्यामध्ये खेळीमेळीचे वातावरण मागील २०, वीस वर्षांपासून निरंतर कायम आहे.कामगारांच्या प्रश्नांसाठी अनेक आंदोलने, मोर्चा यामध्ये प्रमुख भुमिका असते.. संघटनेमार्फत दरवर्षी अनाथ आश्रमाला, वृद्धाश्रमात गरजेनुसार साहित्य पुरवले जाते (अन्नधान्य,मेडीकल, कपडे, शालेय साहित्य)मोफत देण्यात येते.. औद्योगिक श्रेत्रात अपघाताने किंवा नैसर्गिक मृत्यू झालेल्या कामगारांच्या विधवा पत्नींना,त्यांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाह चालवण्यासाठी शिलाई मशीन वाटप करण्यात येतात यामध्ये सक्रीय सहभाग असतो. आदरणीय श्रीमती सुप्रिया बडवे मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित दरवर्षी वृक्षारोपण कार्यात सक्रिय सहभाग नोंदवुन शेकडो झाडे लावण्यात आली आहेत व संगोपन संवर्धन ही नियमीत करण्यात येथे. घाटी रुग्णालयातील गरीब रुग्णांना रक्ताची गरज असते त्यामुळे दरवर्षी सन २००२ पासुन ते आजपर्यंत नियमीत १० आॅक्टोबर रोजी श्रीकांत बडवे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण बडवे ग्रुपमध्ये भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या संकल्पनेची सुरुवात केली त्या टिममध्ये श्री विजयकुमार रामराव पांचाळ यांचाही सहभाग आहे..
आत्तापर्यंत हजारो गरीब रुग्णांना मोफत रक्त पुरवले जाते..
भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस व किमान वेतन सल्लागार समितीचे सदस्य श्री प्रभाकर मते पाटील साहेब यांनी विजयकुमार रामराव पांचाळ हे आमच्या संघटनेचे व कामगारांचे भुषण आहेत असे सन्मानपत्र देवून.
श्री विजयकुमार रामराव पांचाळ यांचा व त्यांच्या परीवाराचा सन्मान केला आहे.तसेच बडवे ग्रुपचे एम,डी, श्री श्रिकांत बडवे साहेब, बडवे ग्रुपच्या डायरेक्टर श्रीमती सुप्रिया श्रीकांत बडवे मॅडम, बडवे ग्रुप औरंगाबाद विभागाचे व्हि.पी.श्री विजय कस्तुरे सर, बडवे ग्रुप औरंगाबाद विभागाचे एच आर हेड श्री शशीशेखर ढापणे सर, प्लॅटहेड श्री एस.पी.शिंदे , मनोज कुलकर्णी,शेख फिरोज, श्री सातपुते सर,श्री खांडरे.
कामगार कल्याण मंडळाचे सहकल्याण आयुक्त श्री मनोज पाटील सर,श्री दिनकर पाटील श्री अहिरे सर श्री श्याम पाटीलसर,श्री मोरे सर, भारतीय कामगार सेना मराठवाडा विभागाची संपूर्ण टिम .. संपुर्ण मराठवाड्यातील कामगार प्रतीनिधी , बडवे इंजिनिअरिंग सर्व कामगार व प्रतीनिधी यांनी श्री विजयकुमार रामराव पांचाळ यांचे सहपरीवार अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या…
महाराष्ट्र राज्याचे कामगार कल्याण आयुक्त श्री रवीराज ईळवे साहेब तसेच श्रीमती माधुरी सुर्वे मॅडम सहकल्याण आयुक्त व श्री आदरणीय थोरात साहेब यांनी कामगारांना चांगले मार्गदर्शन केले.. सर्व जणांची काळजी खुप काळजी घेतली.
गुणवंत कामगार पुरस्काराच्या सर्व कार्यपद्धती यशस्वी आनंदी वातावरणात पुर्ण केल्या त्या बद्दल सर्व महाराष्ट्रातील कामगारांचे वतीने त्यांचे अभिनंदन .

 

*ऑफर… ऑफर….. ऑफर….💃💃*

*_कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी पार्क गृह प्रकल्पात ग्राहकांना मिळणार ” ऑफर”…_*

*_१६ लाखात १ बीएचके, तर २७ लाखात २ बीएचके फ्लॅट; दुकान गाळा फक्त १० लाखात…_*
ऑफर*

*🥳पुन्हा एकदा कुडाळ शहरात १६ लाखात फ्लॅट घेण्याची संधी…!💃*

*_🥰आता आमची नवी ओळख “छत्रपती शिवाजी पार्क”…🥰_*

*ग्राहकांच्या उत्स्फूर्त😍 प्रतिसादानंतर आम्ही घेऊन आलो🤩 आहोत…! खास *दसरा🎊 ऑफर…!😍🥳💃*

*मंदी नही…! 😍ये संधी है…!🤩*

*_🏡 छत्रपती शिवाजी पार्क🌴_*
*_🌴गृहप्रकल्प-कुडाळ🏡_*

*👉 घेऊन आले आहेत…!स्मार्टसिटीच्या 🛣️ वाटेवर असलेल्या कुडाळात मध्यवर्ती भागात तयार ताबा 1BHK फ्लॅट फक्त १६ लाखात, 2 BHK फ्लॅट फक्त २७ लाखात तोही GST सह, तर १० लाखात मिळावा दुकान गाळा…!*

👉 *_पहिल्या पाच ग्राहकांना ही संधी…😍🥳🤩_*

*आठ बिल्डिंगच्या🏬 भव्य-दिव्य गृह प्रकल्पा 🏡 सोबत १५ हजार स्क्वेअर फूट गार्डन🏕️,गणेश मंदिर🛕,स्विमिंग पूल🗾,क्लब हाउस🏸,जिम 💪आणि प्रशस्त पार्किंगची🚘 सुविधा…!*💃

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी २५० ची मेगा टाऊनशिप…🏬*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून चालत फक्त ३ मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर…🚆*
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🛑 मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

*🏡 आमचा पत्ता:- साईट शिवाजी पार्क,सत्कार हॉटेल रोड,जुना बस स्टँड समोर,कुडाळ*

*📲 संपर्क :- **९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१*
*९४०४७५१५००*
_______________________

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + 7 =