You are currently viewing व्यवसायकर 31 मार्च पूर्वी भरण्याचे आवाहन

व्यवसायकर 31 मार्च पूर्वी भरण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी 

महाराष्ट्र व्यवसायकर कायदा 1975 अन्वये नावनोंदणीकृत व नोंदणीकृत असलेलया व्यक्ती व मालक यांनी आपला व्यवसायकर 31 मार्च 2021 पूर्वी भरणा करणे आवश्यक आहे. तरी सर्व नावनोंदित व नोंदणीकृत व्यक्ती व मालक यांनी मुदतीत कर भरणा करुन  शासनाच्या महसूल वाढीस सहकार्य करावे. तसेच अनोंदित व्यक्ती व मालक यांनी त्वरीत नोंदणी दाखला घेवून व्यवसायकराचा भरणा  करावा असे आवाहन वैशाली .काशीद राज्यकर सहआयुक्त व्यवसायकर ,कोल्हापूर क्षेत्र,कोल्हापूर यांनी केले आहे.

         विहित मुदतीत करभरणा न केल्यास सदर कायद्यानुसार कर, व्याज, शास्ती किंवा शुल्क यासह रक्कम वसूल करण्याची कारवाई करण्यात येईल याची सर्व नावनोंदित व नोंदणीकृत व्यक्ती व मालक यांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी वस्तू व सेवा कर कार्यालय व्यवसायकर विभाग, ओरोस दुरध्वनी क्रमांक 02362-228707 येथे संपर्क साधावा असे आवाहन व्यवसायकर अधिकारी राजकुमार सागरे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा