*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवि चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नारी स्वर्गसुंदरी*
नदी किनारी रोज दिसते एक नारी
रूपवान लावण्यवती स्वर्गसुंदरी
वारा छेडतो खोड्या काढतो फार
केस उडती उडतो साडीचा पदर
खट्याळ वारा झोंबतो अंगाला
यौवनाचा भार भिडतो मनाला
नजरेत भरते मना वेड लावते
नदी किनारी नारी उभी राहते
आस मिलनाची इच्छा भेटण्याची
कोणाची कोण ती मलाच का दिसते
भास मनाचा की हे स्वप्न आभासी
मलाच माझे मन का छळते
नदी किनारी रोज दिसते एक नारी
रूपवान लावण्यवती स्वर्गसुंदरी
कवी :-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर,धुळे.*
७५८८३१८५४३.
८२०८६६७४७७.
