*करिअर, संसारासाठी महिलांचे सुदृढ आरोग्य आवश्यक! – उपमहापौर शर्मिला बाबर यांचे आवाहन*
पिंपरी
‘करिअरकडे लक्ष देताना तथा संसाराचा गाडा ओढत असतानाच महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष दिले पाहिजे’ असे मत पिंपरी – चिंचवडच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी व्यक्त केले. विविध भारती म्युझिकल इव्हेंट मार्फत “साथिया ये तुने क्या किया…” हा हिंदी – मराठी सुमधुर गाण्यांचा कार्यक्रम प्राधिकरणातील गदिमा नाट्यगृहात पार पडला. यावेळी उपमहापौर बोलत होत्या. शिक्षण मंडळाच्या माजी सभापती गिरिजादेवी कुदळे, प्रसिद्ध एकपात्री कलाकार शारदा मुंडे आदी उपस्थित होते. यावेळी महिलादिनाचे औचित्य साधून उपमहापौर बाबर यांच्या हस्ते मुंडे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
बाबर म्हणाल्या की, ‘एखाद्या कुटुंबातील महिला आरोग्यसंपन्न असल्यास ती संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य व्यवस्थित सांभाळू शकते. महिला कितीही सामाजिक क्षेत्रात तसेच आपल्या कामाच्या ठिकाणी कार्यरत असली तरी, कुटुंबातील सगळी कामे, जबाबदाऱ्या तिलाच पार पाडाव्या लागतात. त्या अनुषंगाने महिला भगिनींनी आपले आरोग्य सांभाळून इतर गोष्टी केल्या पाहिजेत. यावेळी महिला दिनानिमित्त झालेले महिलांचे सत्कार त्यांना प्रोत्साहित करणारे आहेत, असेही त्या म्हणाल्या.
यानिमित्त आयोजित “साथिया ये तुने क्या किया…” या गाण्यांच्या कार्यक्रमात सहआयोजिक, पुणे आयडॉल डॉक्टर सायली, विशेष अतिथी गायिका ललिता जगदाळे यांच्यासह नंदकुमार कांबळे, विनायक कदम, राजेंद्र पगारे, चंद्रकांत हिवरकर, संजय बोरसे, सतीश कापडी, शैलेंद्र पाटील, सुनील जोशी, प्रसाद पवार, चंदन गायकवाड, डॉक्टर सुमेध, विनायक सूर्यवंशी, उत्तम जाधव, विश्वांत काळोखे या गायक कलाकारांनी सुमधुर गाणी सादर केली, त्यास रसिक श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.
‘इशारो इशारो में दिल देने वाले’ , ‘तेरे मेरे मिलन की यह रैना’ , ‘दिवाना हुवा बादल’ पासून मराठी गीते ‘भुरुम भुरुम’ , ‘ धिपाडी धिपांग’ , ‘शुक्रतारा मंद वारा’ अशी विविध गाजलेली गाणी सादर करण्यात आली.
याप्रसंगी दिशा सोशल फाउंडेशनचे संस्थापक – अध्यक्ष बाळासाहेब जवळकर, उपाध्यक्ष संतोष बाबर, सुचिता शेटे शर्मा, साहिल कांबळे, सानिका कांबळे, मुकेश चौधरी, नेहा चौधरी, नरेंद्र जोशी, टाटा मोटर्स एच आर मधील सतीश मोटे, नोवेल इंटरनॅशनल शाळेचे संचालक विलास जेऊरकर, यशवंत ठाकूर, प्रकाश बापर्डेकर, यशवंत मिस्तरी, संध्या बडोले, अनिल जंगम, डॉ. किशोर वराडे, अरुण सरमाने उपस्थित होते. शैलेश घावटे यांनी ध्वनिसंयोजन केले. विक्रम क्रिएशन यांनी दृकश्राव्यचित्रण केले. नागेश झळकी यांनी छायाचित्रण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घनश्याम अग्रवाल यांनी केले. सचिन शेटे यांनी आभार मानले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
