You are currently viewing राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या राज्य मेळाव्याचे कोल्हापूर येथे उद्या आयोजन 

राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या राज्य मेळाव्याचे कोल्हापूर येथे उद्या आयोजन 

 

कोल्हापूर येथे राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचा राज्य मेळावा व राज्य कार्यकारणी सभा उद्या रविवार दिनांक 2 एप्रिल 2023 रोजी संपन्न होणार आहे .सर्व राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दशरथ शिंगारे यांनी केलेले आहे .
राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेच्या वतीने राज्यातील राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षका़चा मेळावा व कार्यकारीणीची सभा रविवार दिनाक २ एप्रिल २०२३ रोजी दि प्राथमिक शिक्षक सहकारी बॅक ली कोल्हापूर च्या प्रधान कार्यालयाच्या सभागृहामध्ये सकाळी १० : 00ते साय .५ .00 वा. या वेळेत राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार समारंभ व राज्य कार्यकारिणी सभा आयोजित केलेली .सदर सत्कार सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रा.जयंत आसगावकर , शिक्षक नेते दादासाहेब लाड, चेअरमन सुनिल एडके ,सुरेश कोळी ,अनंता जाधव, दशरथ शिंगारे,पाकिजा पटेल,माधव वायचाळ यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे.या शिक्षक मेळाव्यात राज्यातील सेवानिवृत्त राज्य व राष्ट्रीय पुरस्कार शिक्षकांचा तसेच २०२२ मधील राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा यथोचित सन्मान संघटनेच्या वतीने व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे . राज्यकार्यकारीणीसाठी व जिल्हा कार्यकारणी पर्दी नियुक्ती करण्यात आलेल्या पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात येणार आहेत.तसेच राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या प्रश्नांसाठी संघटनेकडून आतापर्यंत शासनस्तरावर केलेले प्रयत्न व यापुढे संघटनेकडून प्रश्नांसाठी करण्यात येणारे प्रयत्न व संघटनेचे ध्येय धोरण यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहेत.तसेच संघटनेची भविष्यात वाटचाल यावर सांगोपांग चर्चा करून अनेक निर्णय घेण्यात येणार आहेत.तेव्हा या शिक्षक मेळाव्याला व बैठकिस राज्यातील राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सुभाष जिरवणकर, – राज्याध्यक्ष ,दशरथ शिंगारे – राज्यकार्याध्यक्ष यांनी केले आहे .राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र या संघटनेचा राज्य मेळावा यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी संघटनेच्या वतीने माधव वायचाळ,अनंता जाधव,सतीष चिपरीकर , शाहु चौगले,नवनाथ व्हरकट,संजय जगताप, हिंदुराव मातले ,संभाजी ठुंबे,रमेश गंगावणे,पाकिजा पटेल ,बळीराम चापले, बालाजी जबडे , श्रीकांत पाटील , सुनिल गुरव , नागनाथ येवले , प्रशांत राऊत , रमेश पेटकर , भिमराव शिंदे , शिवराज सावंत , एकनाथ पवार , रघुनाथ घोगळे व पुणे विभागीय कार्यकारणी सदस्य व कोल्हापूर जिल्हा कार्यकारणी सदस्य मेहनत घेत आहेत .

प्रतिक्रिया व्यक्त करा