You are currently viewing बीएसएनएलच्या विरोधात सावंतवाडीत उद्या ठाकरे शिवसेनेचा मोर्चा…

बीएसएनएलच्या विरोधात सावंतवाडीत उद्या ठाकरे शिवसेनेचा मोर्चा…

बीएसएनएलच्या विरोधात सावंतवाडीत उद्या ठाकरे शिवसेनेचा मोर्चा…

सावंतवाडी

शहरातील बीएसएनएलच्या विस्कळीत सेवेविरोधात ठाकरे शिवसेना आक्रमक झाली आहे. कॉल न लागणे, वारंवार कॉल कट होणे अशा समस्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी ठाकरे शिवसेना उद्या सकाळी १०.३० वाजता बीएसएनएल कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात येणार आहे.

या आंदोलनात शहरप्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, महिला आघाडी प्रमुख पदाधिकारी, युवा सेना प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन तालुकाप्रमुख मायकल डिसोजा यांनी केले आहे. बीएसएनएल ची सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे, असे श्री. डिसोजा यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा