वाकड ,चिंचवड -(रविवार 8 मार्च 2026 ) आनंद ज्येष्ठ नागरिक संघामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात नव्वदहून अधिक महिला एकत्रित आल्या.
सभेमध्ये महिला दिनानिमित्त विशेष माहिती देण्यात आली. संघर्ष आणि जिद्द तिची ओळख.यशाच्या शिखरावर तिचीच चाहूल स्पष्ट.स्त्रीशक्ती ला वंदन करू या .महिला दिनी देवू या आदराचा साज .ती आई, ताई, मैत्रिण, पत्नी, मुलगी, ती जन्म आहे, ती माया आहे, ती सुरुवात आहे आणि तिच नसेल तर सर्व व्यर्थ आहे.
जागतिक महिला दिन हा महिलांच्या कर्तृत्वाचा संघर्षाचा आणि योगदानाचा गौरव साजरा करण्यासाठी केला जातो. ती केवळ एकाच कुटुंबाची नव्हे तर संपूर्ण समाजाची शक्ति आहे. ती अनेक भूमिका पार पाडत असताना समाजाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देते.
या सांस्कृतिक कार्यक्रम अंतर्गत महिला मंडळ प्रमुख अलका ताई कळमकर,मीरा बोरकर, पुष्पा ढवळे, चित्रा बराटे, संगीता साठे, प्रतिभा गवळे,हेमांगी बोंडे, निर्मला झोपे,विजया चौधरी, विभा दरेकर ,सुनिता सफई, हर्षाली देसाई यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
