You are currently viewing ज्येष्ठ गझलकार श्री जयराम धोंगडे यांना माणुसकी मल्टिपर्पज फाउंडेशन महाराष्ट्र राज्यचा राजे शिवछत्रपती प्रेरणा राज्यस्तरीय पुरस्कार -२०२६ चा “आदर्श साहित्यरत्न” पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ गझलकार श्री जयराम धोंगडे यांना माणुसकी मल्टिपर्पज फाउंडेशन महाराष्ट्र राज्यचा राजे शिवछत्रपती प्रेरणा राज्यस्तरीय पुरस्कार -२०२६ चा “आदर्श साहित्यरत्न” पुरस्कार जाहीर

नांदेड :

नांदेड येथील ज्येष्ठ गझलकार श्री जयराम धोंगडे यांच्या साहित्य क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन मलकापूर, बुलढाणा येथील माणुसकी मल्टिपर्पज फाउंडेशन महाराष्ट्र राज्यचा राजे शिवछत्रपती प्रेरणा राज्यस्तरीय पुरस्कार -२०२६ च्या “आदर्श साहित्यरत्न” पुरस्कारासाठी त्यांची निवड जाहीर झाली आहे. सदर पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते रविवार दिनांक २९ मार्च २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता तालुका शिक्षक संघ पतसंस्था हॉल, मलकापूर बुलढाणा येथे करण्यात येणार आहे. माणुसकी मल्टिपर्पज फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कडून त्यांच्या निवडीचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यांना मिळालेल्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी साहित्य क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या श्री जयराम धोंगडे यांनी कोरोना काळापासून कविता, गझल लेखनास प्रारंभ केला. अल्पावधीतच त्यांची शब्दाटकी , कोरोनायन, जय बोले, मी छंद मी स्वच्छंदी, तिपेडी, गझलकारी, झुंज कॅन्सरशी अशी एकूण सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या या वाटचालीची दखल घेऊन त्यांना “आदर्श साहित्यरत्न २०२६” पुरस्कार जाहीर झाला आहे.

विविध समाजमाध्यमांवर, सोशल मिडियामध्ये त्यांचे साहित्य सातत्याने प्रकाशित होत असते. त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आदी ठिकाणी गझल कट्ट्यामध्ये, वेगवेगळ्या साहित्य संमेलनात गझल सादरीकरणात देखील सहभाग नोंदवला आहे. साहित्य क्षेत्रातील विविध पुरस्कारांनी त्यांना यापूर्वी देखील सन्मानित केलं गेलं आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा