You are currently viewing कुडाळच्या प्राजक्ता गवाणकरची MPSC मधून सहाय्यक अभियंता (वर्ग २) पदावर निवड

कुडाळच्या प्राजक्ता गवाणकरची MPSC मधून सहाय्यक अभियंता (वर्ग २) पदावर निवड

कुडाळच्या प्राजक्ता गवाणकरची MPSC मधून सहाय्यक अभियंता (वर्ग २) पदावर निवड

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव महिला उमेदवार; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात पहिली नेमणूक

कुडाळ

कुडाळ येथील कु. प्राजक्ता राजाराम गवाणकर हिची नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार MPSC मार्फत सहाय्यक अभियंता वर्ग २ (राजपत्रित) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या पदावर निवड झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून यश मिळवणारी ती एकमेव महिला उमेदवार ठरली असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सिंधुदुर्ग नगरी येथील विभागीय कार्यालयात तिची पहिली नेमणूक झाली आहे.
प्राजक्ता हिचे १२वीपर्यंतचे शिक्षण कुडाळ हायस्कूल येथे झाले. त्यानंतर कोल्हापूर येथील KIT कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधून तिने बी.ई. (सिव्हिल) प्रथम श्रेणीत पूर्ण केले. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी तिने पुणे येथे दोन वर्षे अभ्यास केला. या काळात तिने कनिष्ठ अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग (जि.प. सिंधुदुर्ग), जि.प. रत्नागिरी, भूमि अभिलेख विभाग आणि स्थापत्य अभियंता सहाय्यक अशा चार पदांवर निवड मिळवली होती. सध्या ती जि.प. सिंधुदुर्ग येथे कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहे.
दररोज १२ ते १४ तास अभ्यास, नियमित सराव, मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन यामुळे हे यश मिळाल्याचे प्राजक्ता हिने सांगितले. या यशामागे आई-वडील राजाराम व राणी गवाणकर, भाऊ डॉ. राहुल गवाणकर, कुटुंबीय तसेच अधिकारी मित्रांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभल्याचे तिने नमूद केले. भविष्यात आपल्या पदाचा उपयोग सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी आणि पारदर्शक प्रशासनासाठी करणार असल्याचा निर्धारही तिने व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा