You are currently viewing मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचे जेट टॉईज स्पर्धेत उत्तुंग यश !   

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचे जेट टॉईज स्पर्धेत उत्तुंग यश !  

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचे जेट टॉईज स्पर्धेत उत्तुंग यश !

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांनी जेट टॉईज स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादित केले. महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, मुंबई द्वारे आयोजित लोकल ऑलिंपिक जेट टॉईज स्पर्धा गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी वसुंधरा सायन्स सेंटर कुडाळ येथे संपन्न झाली. या स्पर्धेत कु श्लोक सावंत, कु रिया जेवरे, कु. अझिमन करोल, कु. आराध्य गावडे
या इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांच्या संघाने सांघिक कौशल्याच्या जोरावर द्वितीय क्रमांक पटकावला.सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक व मेडल देऊन गौरविण्यात आले.
या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत ,डॉ.सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगांवकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा