You are currently viewing प्रत्येकाने आपली मातृभाषेचा आणि बोलीभाषेचा अभिमान बाळगला पाहिजे: सौ.स्मिता नाईक

प्रत्येकाने आपली मातृभाषेचा आणि बोलीभाषेचा अभिमान बाळगला पाहिजे: सौ.स्मिता नाईक

*मळगाव वाचनालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा*

सावंतवाडी / मळगाव:

प्रत्येकाने आपल्या मराठी मातृभाषेचा आणि मालवणी बोली भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे. मालवणी बोली हा मराठीचा आत्मा असून विविध भाषा ही साहित्याची रूपे आहेत. आपल्या भाषेचा अभिमान बाळगत असताना इतर भाषांचा द्वेष अथवा तिरस्कार करणे मराठी भाषेमध्ये विपुल साहित्य संपदा असून मराठी समृद्ध भाषा असून मराठी वाङ्मय प्रत्येकाने वाचलं पाहिजे त्याचबरोबर मराठी वर अतिक्रमण होणार नाही याची सुद्धा काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे.

मळगाव वाचनालयात नेहमीच विविध सांस्कृतिक साहित्यिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू असून नित्यनेमे मराठीत भाषेचे गौरवगीत सुरू आहे असे गौरव उद्गार मळगाव वाचनालयातील मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने उपस्थित प्रमुख अतिथी सौ स्मिता नाईक यांनी काढले.

मळगाव येथील कै.उदय रमाकांत खानोलकर वाचनालयात ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांची जयंती विविध कार्यक्रमानी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सौ स्मिता नाईक या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या व्हिडिओ व्यासपीठावर वाचनालयाचे उपाध्यक्ष बाबली गावडे कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी संस्मिता नाईक संचालक चंद्रकांत जाधव, शिक्षिका श्रीम.सीमा सावंत आदि उपस्थित होते.

यावेळी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून ग्रंथालयातर्फे नव्याने खरेदी केलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी गावातील शतक महोत्सवी जि. प. मळगाव शाळा (रस्तावाडी) ३० विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी श्लोक ग. राऊळ (छत्रपती संभाजी महाराज), कुमारी निधी वसंत राऊळ (मी जिजाऊ बोलतेय), आलिया अमर राऊळ (दिनूचे बिल), आशुतोष शि. तारळकर (छत्रपती शिवाजी महाराज), ओवी प्रसाद आडेलकर (आरुणीची गोष्ट), आराध्या अभिजीत पवार (बाजीप्रभू वरील पोवाडा), काव्या अर्जुना राहुल (कुसुमाग्रजांची कविता), देवेश राजन राऊळ (छत्रपती शिवाजी महाराज व बाजीप्रभू यांच्यामधील पावन खिंडीच्या लढाई वेळचा संवाद), मनस्वी कुंभार / ग्रेस फर्नांडिस (कविता), सौ मानसी मुरलीधर गवंडे (कुसुमाग्रजांच्या नटसम्राट नाटकाची समीक्षा), जानवी प्रभाकर अमरे, पु ल देशपांडे यांची चरित्र कथा, नेहा चंद्रशेखर मेस्त्री (कविता), प्रसन्न प्रदीप सोनुलकर साने गुरुजी यांची मृगाजीन कथा, राष्ट्रवादी श्री प्रभाकर तेली (गझल गायन व श्रावण बाळ कविता) आदींनी आपल्या उत्कृष्ट सादरीकरणातून मराठी भाषेचा गौरव केला.

जि. प. शाळा (रस्ता) मळगावच्या मुलांच्या सादरीकरणाचे विशेष कौतुक करून सौ.स्मिता नाईक यांनी त्यांना ₹.५००/- बक्षीस दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच सूत्रसंचालन वाचनालयाच्या कार्यवाहक सौ.स्नेहा महेश खानोलकर यांनी केले. आभार संचालक रितेश राऊळ यांनी मानले.

कार्यक्रमाला ग्रंथालयाचे संचालक हेमंत खानोलकर, शांताराम गावंडे माजी संचालक बाळकृष्ण मुळीक, ग्रंथालयाचा कर्मचारी वर्ग शिक्षक पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा