*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गझलकार जयराम धोंगडे लिखित अप्रतिम गझल*
*जगरहाटी*
*एकट्याने चालणे वाटते आहे बरे…*
*लागले बोलू मलाही नद्या नाले झरे!*
*वेळ वाया घालणे टाळतो मी सारखा…*
*शोधतो आनंदवाटा निराळ्या हे खरे!*
*जगरहाटी सारखी धावते आहे पुढे…*
*रोजच्या स्पर्धेमुळे रोज भरते कापरे!*
*जोडली की माणसे जोडली जातात पण…*
*सोय करणाऱ्यास मी मानतो बस सोयरे!*
*माणसा रे माणसे मानसाळू लागती…*
*फक्त टाळाया हवे बोल काही बोचरे!*
*जयराम धोंगडे*
