फोंडाघाट येथे हरिनाम सप्ताहाचे आयोजन
बालोपासना व सायंस्मरण भजनाचा लाभ घेण्याचे आवाहन
फोंडाघाट
बेळगाव निवासी प.पू. आई कलावती देवी यांच्या शिकवणुकीनुसार तसेच श्री हरिमंदिरातील भक्तमंडळीच्या मार्गदर्शनाखाली हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. २५/०२/२०२६ ते रविवार dि. ०१/०३/२०२६ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
दररोज सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत बाळगोपाळांसाठी विशेष बालोपासना होणार असून, रात्री ८.३० ते १० या वेळेत वारांचे सायंस्मरण, भजन व कथाकथनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
हा सप्ताह श्री राधाकृष्ण मंदिर, बाजारपेठ येथे आयोजित करण्यात आला असून, सर्व बंधू-भगिनी व बाळगोपाळांनी या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
