*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माझी मायबोली*
मराठी माझी मायबोली
काय तिचे गुणगान गाऊ
मायेची ती सावली
तिचा पदर डोक्यावर घेऊ
ज्ञानदेवांच्या ओव्या तिच्या
ह्रुदयाशी घेऊन कवटाळते
तुकारामांच्या अभंगातून
गौरव गाथा एकवते
रामदासांनी दिला स्वराज्याचा ध्यास
छत्रपती शिवाजी महाराजांनी
वाढवला मराठीचा श्वास
ज्योतीबा फुलेंनी उघडली शिक्षणाची दारे
सावित्रीबाई फुलेनी दुर केले अज्ञानाचे वारे
माराठी भाषा ही संतांची वाणी
शुरविरांची तलवार
मराठी भाषा म्हणजे
संस्कृतीची वाहती अखंड धार
माराठीचा करूया गौरव
करूया तिचा सन्मान
मराठी माझी भाषा
मराठी माझा प्राण
मराठी माणसाच्या अंतःकरणात
मराठीचा दिप उजळत राहवा
मराठी मातीत मराठीचाच
सुगंध कायम दरवळावा
जपूया मराठीचा गोडवा
वाढवूया तिचा मान
मराठी हिच आपली ओळख
मराठी आपला अभिमान
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसुमाई)*
९४२२८९२६१८
९५७९११३५४७
