You are currently viewing समाधी !!ज्ञ..ज्ञानेश्वरीचा..!
Oplus_16908288

समाधी !!ज्ञ..ज्ञानेश्वरीचा..!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*समाधी !!ज्ञ..ज्ञानेश्वरीचा..!*

 

माझ्या मनाची

प्रचंड जागा

व्यापून असलेलं

अनुभव विश्व

माझ्या अंतर्यामातून

मोडीत निघून

नाहीस झालयं….!

प्रचंड पोकळी

निर्माण झाल्याने

रितंरितं वाटतं

अत्यंत मोलाचा

मानसिक ठेवा

नाहीसा झालायं…!

मनाला खरवडून

खरबडून टाकलं

कांहीही मनांत

शिल्लक नाही

आता माझ्या

लक्षांत आलयं…!

ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी

लिहिल्यानंतर समाधी

कां …घेतली…

इहलोकाचा त्याग

कां ….केला ..

याचा मानसिक

अन्वयार्थ माझ्या

ध्यानात आलायं..!

तरीही रुखरुख

कां …आजही…

एकवीसाव्या वर्षी

मनाला छळतयं…!

ज्ञानेश ज्ञानेश्वरा

ज्ञाना..चुकलयं

आजही रुखरुख

समाधी..छळतयं

ज्ञ…..ज्ञानेश्वरीचा

गीता…..सांगतेयं…!!

विश्वाचं आर्त

मनी प्रकाशतयं…!!!

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा