जिल्हाधिकारी होण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाची जी आय ए एस ची परीक्षा द्यावी लागते त्या परीक्षेची तयारी मिशन आयएएस दुसऱ्या वर्गापासून करून देते. त्यासाठी नाममात्र एक रुपया प्रतिदिन इतके अल्प शुल्क आकारण्यात येते. या शुल्कामध्ये मुलांना पुस्तके विनामूल्य मिळतात. याशिवाय त्यांच्या टेस्ट सिरीज देखील घेतल्या जातात. याव्यतिरिक्त या मुलांना कुठल्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क द्यावे लागत नाही.
सध्या ऑनलाईन प्रशिक्षणाचा कल लक्षात घेता मिशन आयएएसने पाचव्या वर्गापासून विद्यार्थ्यांना आयएएसचे ऑनलाईन प्रशिक्षण दिल्लीच्या सुप्रसिद्ध अशा मालुका आयएएस अकादमीच्या वतीने देण्याचे ठरविले आहे. मालुका आयएएस अकादमीचे संचालक श्री लक्ष्मण मालुका त्यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.वर्ग पाच ते बारा या वर्गातील विद्यार्थी या ऑनलाइन कोचिंग सुविधांचा फायदा घेऊ शकतात. यासाठी नाममात्र शंभर रुपये प्रति महिना इतके अल्प शुल्क आकारण्यात आलेले आहे.
दिल्लीची मालुका आयएएस अकादमी ही भारतातील प्रसिद्ध आयएएस अकादमी असून या अकादमीमधून आजपर्यंत अनेक विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाची आयएएस तसेच सनदी परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतामध्ये विविध पदावर कार्यरत आहेत. या अकादमीच्या भारतामध्ये इतरत्रही शाखा आहेत.आयएएसचे प्रशिक्षण ग्रामीण भागापर्यंत सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्यापर्यंत जावे यासाठी हा ऑनलाईन प्रशिक्षणाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी मिशन आय ए एस.चे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांच्याशी 9890967003 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मिशन आय ए एस च्या प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आले आहे .
प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस अमरावती कॅम्प
9890967003
