You are currently viewing देवगड पंचायत समितीचा ‘महाअवास’ अभियानात दुहेरी मानाचा तुरा

देवगड पंचायत समितीचा ‘महाअवास’ अभियानात दुहेरी मानाचा तुरा

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये प्रथम क्रमांक; राज्य पुरस्कृत योजनेत द्वितीय स्थान – विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते सन्मान

देवगड :

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत आवास योजना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात सन 2021- 22 सन 2022 -23 व सन 2023 -24 या कालावधीत महाअवास अभियान राबविण्यात आले होते. या अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना विभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्या हस्ते विभाग स्तरावर पुरस्कार देऊन गौरविण्यात येते .

याचाच एक भाग म्हणून पंचायत समिती देवगडने उत्कृष्ट कामगिरी करीत प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण सन 2022 -23 अंतर्गत पंचायत समिती देवगडला प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे.व राज्य पुरस्कृत आवास योजने मधून पंचायत समिती देवगड चा सन 2021 22 मध्ये सर्वोत्कृष्ट पंचायत समिती म्हणून द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच सदरचा पुरस्कार हा डॉक्टर विजय सूर्यवंशी विभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्या हस्ते विभाग स्तरावर देऊन गौरविण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, अधीक्षक कुणाल मांजरेकर हे उपस्थित होते.

त्याचप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावरील सन 2022 -23 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून तिर्लोट या ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांक प्राप्त झाला असून राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत सन 2021-11 मध्ये ग्रामपंचायत मिठमुंबरी यांना तृतीय क्रमांक प्राप्त झालेला आहे. या यशाबद्दल सर्व स्तरातून पंचायत समिती देवगडचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा