You are currently viewing भाजपा वेंगुर्ले च्या एस्.टी.प्रशासनाच्या विरोधातील आंदोलनाला यश..

भाजपा वेंगुर्ले च्या एस्.टी.प्रशासनाच्या विरोधातील आंदोलनाला यश..

५२ ड्रायव्हर व कंडक्टर पैकी फक्त ३५ कर्मचारी मुंबईला पाठवीले .

वेंगुर्ला
भारतीय जनता पार्टी, वेंगुर्लेच्या आंदोलनाची दखल घेऊन मुंबईला पाठविण्यात येणारे ५२ ड्रायव्हर व कंडक्टर न पाठवता फक्त ३५ कर्मचारी मुंबईला पाठवीले. तसेच तालुक्यातील ८ फे-या ऐवजी २० ते २२ फे-यांचे नियोजन करुन ग्रामीण भागातील प्रवाशांना दिलासा देण्याचे काम भाजपाच्या दणक्याने एस्. टी.प्रशासनाने केले .

मुंबई तील बेस्ट प्रवाशांच्या सोयीकरीता वेंगुर्ले आगारातुन ५२ कर्मचारी पाठविण्याचा घाट आगारप्रमुखांनी केला होता. ही बाब निदर्शनास आल्यावर भाजपा वेंगुर्ले च्या वतीने आगार प्रमुखांना घेराव घालून वेंगुर्ले आगाराला टाळे ठोकण्याचा इशारा भाजपा वेंगुर्ले च्या वतीने देण्यात आला.

प्रथम कुठलीही तडजोडीची भुमिका न घेणा-या एस्. टी.प्रशासनाने नरमाईची भुमिका घेऊन फक्त ३५ कर्मचारी मुंबईला पाठवीले. तसेच ५० वर्षावरील कर्मचा-यांना वगळण्यात आले असल्याचे लिखीत स्वरुपात पत्र आगार व्यवस्थापक चव्हाण यांनी भाजपा पदाधिकारी यांना दिले. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. व भाजपा च्या आंदोलनाला यश मिळाले असुन प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे .

यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जि.का.का.सदस्य वसंत तांडेल, मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर, ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर , किसान मोर्चा चे बाळु प्रभु, युवा मोर्चा जि.चिटणीस संदीप पाटील, ता.चिटणीस समीर कुडाळकर, उभादांडा उपसरपंच गणपत केळुसकर, युवा मोर्चा ता.उपाध्यक्ष संकेत धुरी व दशरथ गडेकर, सोशल मिडीया चे अमेय धुरी, बुथप्रमुख नितीश कुडतरकर , दिनेश धर्णे इत्यादी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + eleven =