You are currently viewing सावंतवाडी येथे स्टेट बँक नजीक बेवारस वृद्ध आढळला;

सावंतवाडी येथे स्टेट बँक नजीक बेवारस वृद्ध आढळला;

सावंतवाडी येथे स्टेट बँक नजीक बेवारस वृद्ध आढळला;

सामाजिक बांधिलकी व पोलिसांच्या मदतीने रुग्णालयात दाखल

सावंतवाडी

सावंतवाडी येथील स्टेट बँक परिसरात आज सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास एक बेवारस वृद्ध आजारी अवस्थेत आढळून आला. संबंधित वृद्धाच्या नाकामध्ये ‘रायल्स ट्यूब’ (Ryles Tube) लावलेली असल्याचे दिसून आले, त्यामुळे त्याची प्रकृती गंभीर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
पोलीस कर्मचारी अंजली पवार यांनी तत्काळ सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान चे रवी जाधव यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच रवी जाधव घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ॲम्बुलन्सच्या सहाय्याने संबंधित वृद्धाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या मदतकार्यात सामाजिक बांधिलकीचे रूपा मुद्राळे, पोलीस कर्मचारी संजली पवार, भूषण भोवर, सामाजिक कार्यकर्ते सुनील आंबेरकर, अनिश बिजली तसेच ॲम्बुलन्स चालक सचिन राणे यांनी सहकार्य केले.
सदर वृद्धाची ओळख अद्याप पटलेली नसून, कोणाला त्यांच्याबाबत माहिती असल्यास जवळच्या पोलीस स्टेशनशी किंवा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा