You are currently viewing व्यसनमुक्ती उपक्रमात योगदानाबद्दल मुख्याध्यापिका माणिक नागावे यांचा गौरव

व्यसनमुक्ती उपक्रमात योगदानाबद्दल मुख्याध्यापिका माणिक नागावे यांचा गौरव

व्यसनमुक्ती उपक्रमात योगदानाबद्दल मुख्याध्यापिका माणिक नागावे यांचा गौरव

जयसिंगपूर : प्रतिनिधी

शेडशाळ ( ता.शिरोळ ) येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे यांचा शाळा स्तरावर व्यसनमुक्तीचे उपक्रम प्रभावीपणे राबवल्याबद्दल गौरव करण्यात आला.

नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य (कोल्हापूर जिल्हा), शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना, लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर येथे आयोजित व्यसनमुक्ती विषयक कार्यशाळेत त्यांना सन्मानित करण्यात आले.

न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती माणिक नागावे यांनी विविध उपक्रम, जनजागृती कार्यक्रम, व्याख्याने व संवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नशामुक्तीविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने सातत्यपूर्ण काम केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी त्यांनी राबवलेले नशाबंदीची शपथ, नशाबंदीवरील व्याख्यान व मार्गदर्शनपर कार्यक्रम,होळी व्यसनाची,एक राखी व्यसनमुक्तीची, व्यसनमुक्ती वरील पोस्टर प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा इत्यादी उपक्रम प्रेरणादायी ठरले आहेत.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत कार्यशाळेच्या निमित्ताने जिल्हा संघटक सुरेश सकटे व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे मुख्य संघटक व चिटणीस श
अमोल मडामे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व भारतीय संविधान कलम 47 ची प्रत देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी शिक्षणसंस्थांची भूमिका महत्त्वाची असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी जीवनशैलीविषयी सकारात्मक दृष्टीकोन विकसित होतो, असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यशाळेत व्यसनांचे दुष्परिणाम, प्रतिबंधात्मक उपाय तसेच युवकांमध्ये जनजागृती कशी वाढवता येईल, यावर मार्गदर्शन करण्यात आले. विविध शाळा, महाविद्यालयांतील शिक्षक, स्वयंसेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा