सहा ग्रामपंचायतींचा 25 फेब्रुवारीला नवी मुंबईत सन्मान
सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जिमाका):–
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2018-19, सन 2019-20, सन 2020-21, सन 2021-22, सन 2022-23 अंतर्गत विभागस्तरावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा व विशेष पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीचा सन्मान दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता सिडको कार्यालय सभागृह, सिडको भवन, बेलापुर, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांत जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतीचा सन्मान होणार आहे. अशी माहिती (पाणी व स्वच्छता) विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अंजिक्य सावंत यांनी दिली आहे.
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन 2018-19 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा अंतर्गत ग्रामपंचायत हुमरस, ता. कुडाळ यांनी प्रथम क्रमांक तर ग्रामपंचायत आयनोडे हेवाळे ता. दोडामार्ग यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. तर संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन 2019-20 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा अंतर्गत ग्रामपंचायत बापर्डे ता. देवगड प्रथम तर ग्रामपंचायत परुळेबाजार, ता. वेंगुर्ला यांनी व्दितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
सन 2020-21 व 2021-22 या कालावधित संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा अंतर्गत ग्रामपंचायत निरवडे ता. सावंतवाडी यांनी प्रथम क्रमांक तर ग्रामपंचायत परुळेबाजार ता. वेंगुर्ला यांनी व्दितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. पुरस्कार विजेत्या सर्व ग्रामपंचायतीचा पुरस्कार वितरण कार्यक्रम दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता सिडको कार्यालय सभागृह, सातवा मजला, सिडको भवन, बेलापुर, नवी मुंबई विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा परिषद (पाणी व स्वच्छता) उप मुख्य कार्यकारी अधिकारी अंजिक्य सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे.
