ओरोस आयटीआयमध्ये गणित व चित्रकला निदेशक पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
पद्मश्री रमाकांत आचरेकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ओरोसमध्ये रिक्त असलेल्या गणित व चित्रकला निदेशक पदांवर तात्पुरत्या स्वरुपात घड्याळी तासिका तत्वावर निदेशक भरण्यात येणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन शासकीय औद्यौगिक प्रशिक्षण संस्था प्राचार्य यांनी केले आहे.
या रिक्त पदे व आवश्यक शैक्षणिक अर्हता शासनाच्या महास्वयंम पोर्टल देण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी महास्वयंम पोर्टलवर अर्ज करावेत किंवा पद्मश्री रमाकांत आचरेकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षक संस्था आरोस येथे दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत टपालाने किंवा हस्तदेय सादर करावेत.
वरीलप्रमाणे अर्ज भरलेल्या किंवा अर्ज हस्तदेय सादर केलेल्या उमेदवारांनी बुधवार दिनांक 4 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता सर्व शैक्षणिक व आवश्यक अहर्तच्या मूळ कागदपत्रे व झेरॉक्सप्रतींसह उपस्थित रहावे. अधिक माहितीकरीता दूरध्वनी क्र. 02362 295808 अथवा भ्रमध्वनी क्रमांक 9422596034 वर संपर्क साधावा, असे आवाहन ओरोस शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य, यांनी केले आहे.
