दिव्यांग बांधवांचा मेळावा वैभववाडी येथे उत्साहात संपन्न
सिंधुदुर्ग
दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना शासकीय योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी वैभववाडी नगरपंचायत सभागृहात सिंधुदुर्ग जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र,सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल व नगरपंचायत वैभव वाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वैभववाडी तालुकास्तरीय दिव्यांग बांधवांचा मेळावा नगराध्यक्षा सौ. श्रद्धा रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.या मेळाव्यास वैभववाडी तालुक्यातील दिव्यांग बांधव, पालक ,सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मेळाव्यास दिव्यांगांसाठी असलेल्या विविध शासकीय योजना, शिष्यवृत्ती ,स्वयं रोजगार योजना, आधारभूत साधनसामग्री वाटप ,आरोग्य तपासणी विषयी मार्गदर्शन करण्यात आले.दिव्यांग प्रमाणपत्र,यु डी आय डी कार्ड, पेन्शन योजना व नोकरी विषयी तज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी दिव्यांनी लाभार्थी योगेश सावंत ( नावळे ) यांना ट्रायसिकल आणि चंद्रकांत गुरखे (खांबाळे )यांना व्हीलचेअर वाटप करण्यात आली. आर्यन कोकरे ( आचिर्णे )याला श्रवण यंत्र देण्यात आली. तसेच गरजू बांधवांना इतर उपकरणांचे वाटप या मेळाव्यात करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि दिव्यांग योजनांची माहिती सिंधुदुर्ग साईकृपा बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल या संस्थेचे अध्यक्ष व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जिल्हा समन्वयक श्री .अनिल शिंगाडे यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी विस्तार अधिकारी श्री.प्रकाश अडुळकर ,कनिष्ठ लिपिक संदीप तांबे, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. दशरथ शिंगारे, ग्रामपंचायत अधिकारी विद्याधर सावंत, उपनगरध्यक्ष, पत्रकार श्री.संजय शेळके, संस्था सहसचिव श्री .सुनील तांबे, संस्था उपाध्यक्ष श्री.शामसुंदर लोट, कर्मचारी विशाखा कासले ,साक्षी गुरव, अभय शिंगाडे ,हर्षद खरात ग्रामपंचायत सदस्य व नगरसेवक आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास सर्व उपस्थितांना अल्पपोहाराची सुविधा श्री .दशरथ शिंगारे यांनी केली व नगरपंचायतीच्या सहकार्याने सभागृह उपलब्ध करून दिला पत्रकार श्री संजय शेळके यांनी कार्यक्रम यशस्वी ते बद्दल केलेले प्रयत्न या सर्वांसाठी संस्था अध्यक्ष श्री .अनिल शिंगाडे यांनी सर्वांचे आभार मानले. या वेळी सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल या संस्थेच्या वतीने उपस्थितीत बांधवांना भेटवस्तू वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुनील तांबे यांनी केले व आभार प्रदर्शन कु.विशाखा कासले यांनी केले.
