राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात.
सावंतवाडी
राजा शिवाजी चौक मित्र मंडळ सावंतवाडी यांच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होणारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाराजांच्या जयंतीनिमित्त बबन साळगावकर यांनी सर्वांना साखर वाटून सर्वांची तोंड गोड केली .
या प्रसंगी अनेक संघटनांची व मान्यवरांची उपस्थिती लाभली मंडळाचे सल्लागार नगराध्यक्ष बबन साळगावकर, मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर सावंतवाडी ची उपनगराध्यक्ष ॲड.अनिल निरवडेकर, नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे, ज्येष्ठ पत्रकार राजन तावडे, दीपक सावंत, नगरसेविका दिपाली भालेकर,सामाजिक कार्यकर्ते नारायण सावंत,बंड्या तोरस्कर दिलीप पवार, अशोक पेडणेकर, दिलीप भालेकर, प्रदीप भालेकर, मंतेश पडते, सत्यम सावंत,सुरेश ठाकूर, चिनू खानोलकर, प्रदीप नाईक,महादेव राऊळ, संजय साळगावकर सोन्या कासार , शुभम मळकाचे, मनोज घाटकर संदीप नाईक, राजेंद्र सांगेलकर, मनोज राऊळ, सचिन तेली व रवी जाधव उपस्थित होते.
