*माझी वसुंधरा ५.० अंतर्गत वेंगुर्ले नगरपरिषदेने कोकण विभागात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल भाजपाच्या वतीने सत्कार.*
*भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व तालुकाध्यक्ष पपु परब यांनी केला सत्कार.*
वेंगुर्ले
माझी वसुंधरा ५.० अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेने कोकण विभागात प्रथम क्रमांक प्राप्त केला याबद्दल नगराध्यक्ष श्री दिलीप गिरप व उपनगराध्यक्ष श्री सुहास गवंडळकर यांचा सत्कार
भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळू देसाई व वेंगुर्ला मंडळ अध्यक्ष श्री. पपु परब यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केला .
याप्रसंगी नगरसेवक श्री. प्रणव वायंगणकर ,श्री. सचिन शेट्ये, श्री सदानंद गिरप , नगरसेविका सौ. सुषमा खानोलकर, सौ आकांक्षा परब , सौ. काजल गिरप, सौ. शीतल आंगचेकर, सौ. गौरी माईणकर, सौ. रिया केरकर , श्रीम. गौरी मराठे व वेंगुर्ला न प चे प्रशासकीय अधिकारी श्री. अभिजित पाटील उपस्थित होते .
