*सुर्वे माणुसकीचा कैवार घेणारे कवी! – डाॅ. श्रीपाल सबनीस*
पिंपरी
‘नारायण सुर्वे हे माणुसकीचा कैवार घेणारे कवी होते!’ असे गौरवोद्गार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सोमवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी आदर्शगाव हिवरेबाजार, जिल्हा अहिल्यानगर येथे काढले. पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी आयोजित काव्यजागर संमेलनात डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. महाराष्ट्र शासनाच्या आदर्शगाव संकल्प आणि प्रकल्पाचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार अध्यक्षस्थानी आणि स्वागताध्यक्षपदी
श्रमश्री बाजीराव सातपुते होते; याशिवाय लघुउद्योजक इंद्रजित पाटोळे, कामगारभूषण राजेंद्र वाघ, हिवरेबाजारच्या सरपंच विमल ठाणगे आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी हिवरेबाजार येथील यशवंत माध्यमिक विद्यालयाला पद्मश्री नारायण सुर्वे संस्कारक्षम शिक्षणसंस्था पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. त्याचबरोबर संस्कारक्षम गृहिणी प्रभावती विठ्ठल वाघ (मास्तरांची सावली – कृष्णाबाई सुर्वे सन्मान), ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सतीश गोरडे (पद्मश्री नारायण सुर्वे भला माणूस पुरस्कार), कविवर्य म. भा. चव्हाण (पद्मश्री नारायण सुर्वे काव्यसाधना पुरस्कार), कवयित्री मानसी चिटणीस (पद्मश्री नारायण सुर्वे काव्यप्रतिभा पुरस्कार) यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रतिमा काळे, प्रभाकर वाघोले, राजेंद्र वाघ, ललिता सबनीस आणि पुरस्कारार्थी कवींनी नारायण सुर्वे यांच्या कवितांचे अभिवाचन करीत काव्यजागर केला.
डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, ‘स्त्री, कामगार, कष्टकरी, दलित, वंचित यांच्यातील माणसाचा सुर्वे यांनी नेहमी सन्मान करीत गांधीवाद अन् मार्क्सवाद यांची बेरीज केली. हिवरेबाजार म्हणजे धर्मनिरपेक्ष भारताचे प्रतीक आहे!’ सतीश गोरडे यांनी, ‘वकिली व्यवसायाच्या माध्यमातून तुटणारी कुटुंबे आणि दुभंगणारा समाज जोडण्याची संधी लाभली!’ अशी भावना व्यक्त केली. म. भा. चव्हाण यांनी ‘आई’ आणि डॉ. विठ्ठल वाघ यांनी ‘तिफन’ या कवितांचे सादरीकरण करीत विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले; तर बाजीराव सातपुते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पोपटराव पवार यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘आमच्या शाळेतील विद्यार्थी येथे आलेल्या उत्तुंग प्रतिभेच्या कवींकडून काव्यलेखनाची प्रेरणा घेतील!’ असा विश्वास व्यक्त केला.
बालविद्यार्थिनीच्या हस्ते वृक्षपूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविकातून पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर कार्यक्रमांचे नियोजन असून हे त्यातील पाचवे पुष्प आहे, अशी माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद, राजगुरूनगर शाखेच्या वतीने पद्मश्री नामदेव ढसाळ साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. राजू जाधव, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. अरुण गराडे यांनी आभार मानले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
_________________________
*संवाद मीडिया*
👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕
*Admission Open…..Admission Open*
*🎓 G.N.M. नर्सिंग प्रवेश 2026–27 सुरू 🎓*
*यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, रत्नागिरी येथे नर्सिंग क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी.*
*✅ 12 वी परीक्षापूर्वी GNM अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची सुवर्णसंधी*
*✅ 3 वर्षांचा G.N.M. नर्सिंग अभ्यासक्रम*
*✅ इंडियन नर्सिंग कौन्सिल व महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मान्यताप्राप्त*
*✅ शासकीय नियमानुसार शिष्यवृत्ती सुविधा उपलब्ध*
*✅ अनुभवी प्राध्यापक वर्ग व उत्तम शैक्षणिक वातावरण*
*✅ आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंग व प्रॅक्टिकल एक्सपोजर*
*✅ अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ₹35,000 ते ₹40,000 पर्यंत पगाराची नोकरी मिळवण्याची संधी*
*✅ 100% प्लेसमेंट असिस्टन्स*
*📍 पत्ता: मिरजोळे रोड, MIDC, एअरपोर्ट जवळ, रत्नागिरी*
*📞 संपर्क: 8600302454 / 9423291863 / 8830789570*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/195145/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
