You are currently viewing सामाजिक कार्यकर्ते बबन डिसोझा यांच्या पाठपुराव्यामुळे गोविंदचित्र मंदिर–भटवाडी रस्त्यावरील धोकादायक खड्डे बुजवले

सामाजिक कार्यकर्ते बबन डिसोझा यांच्या पाठपुराव्यामुळे गोविंदचित्र मंदिर–भटवाडी रस्त्यावरील धोकादायक खड्डे बुजवले

सामाजिक कार्यकर्ते बबन डिसोझा यांच्या पाठपुराव्यामुळे गोविंदचित्र मंदिर–भटवाडी रस्त्यावरील धोकादायक खड्डे बुजवले

सावंतवाडी

भटवाडी परिसरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गोविंदचित्र मंदिर ते भटवाडी या मार्गावरील रस्त्यावर गेल्या सहा महिन्यांपासून खड्ड्यांचे प्रमाण वाढत चालले होते. हे खड्डे अपघाताला निमंत्रण देणारे ठरत असल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी भटवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा व्यावसायिक बबन डिसोझा यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे अखेर नगरपरिषदेने संबंधित रस्त्यावरील धोकादायक खड्डे डांबर-खडी टाकून बुजवले.
स्थानिक नागरिकांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त करत बबन डिसोझा यांच्या तत्परतेचे व सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले आहे. सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय असून, विविध प्रश्नांवर ते नेहमीच पुढाकार घेत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा