You are currently viewing वैभववाडी महाविद्यालयाच्या शुभम हळदीवेचे यश

वैभववाडी महाविद्यालयाच्या शुभम हळदीवेचे यश

*वैभववाडी महाविद्यालयाच्या शुभम हळदीवेचे यश*

वैभववाडी

मुंबई विद्यापीठाच्या ठाणे झोन क्रीडा समिती व टी. झेड. ए. एस. पी. मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रगती कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, डोंबिवली (पूर्व) येथे १३ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित इंटर कॉलेजिएट बेस्ट फिजिक (शरीर सौष्ठव) पुरुष स्पर्धा २०२५–२०२६ वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील तृतीय वर्ष विज्ञान शाखेतील कु. शुभम धनंजय हळदीवे याने ६० किलो वजन गटात एकूण ५५ स्पर्धकांमधून पाचवा क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले असून या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याची कोकण झोनचे प्रतिनिधित्व करत विद्यापीठ स्तरावर निवड झाली आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, क्रीडा संचालक, प्राध्यापकवर्ग व विद्यार्थ्यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा