You are currently viewing लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि गायिका देवयानी बेंद्रे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश..

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि गायिका देवयानी बेंद्रे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश..

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर व गायिका देवयानी बेंद्रे यांनी अजित दादा पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबईच्या राष्ट्रवादी कार्यालयात हा सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्यावतीने हा पक्ष प्रवेश घेण्यात आला होता.

यावेळी मुंबई महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते बबनराव गवस, मनसेच्या महिला पदाधिकारी मनिषा खैरे, अशोकराव सवने, प्रभाकर शेट्ये, संजय त्रिपाठी, सुरेश बागवे, नितीन पाटील, ओंकार गवस यांनीदेखील राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी अजितदादा पवार यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. तसेच जे नवीन सदस्य पक्षप्रवेश करत आहेत, त्यांच्यासोबत सुसंवाद ठेवून त्यांना पक्षाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सामावून घ्यावे अशी सूचनाही केली.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − 3 =