दोडामार्गात शिवसेनेचे १०० टक्के यश;
विजयी उमेदवारांचा सत्कार, गद्दारांना इशारा – संजू परब
दोडामार्ग :
दोडामार्ग तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघात शिवसेनेचे १०० टक्के उमेदवार विजयी झाल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत विजयी उमेदवारांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
मणेरी जिल्हा परिषद सदस्य म्हणून सौ. साक्षी विशांत तळवडेकर, झरेबांबर पंचायत समिती सदस्य म्हणून श्रीमती स्नेहा संजय गवस, कोनाळ पंचायत समिती सदस्य म्हणून सौ. सायली स्वप्निल निंबाळकर तर कोलझर पंचायत समिती सदस्य म्हणून गणेशप्रसाद गवस यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करावेत, पक्षाचे संपूर्ण सहकार्य सदैव राहील, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राजू निंबाळकर व विलास सावंत यांनी निवडणूक काळात काहींनी चुकीचा प्रचार केल्याचे तसेच स्वकीयांनी अपक्षांना साथ दिल्याचे नमूद केले. त्यावर बोलताना संजू परब यांनी, “चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्यांना क्षमा नाही. अशा वागणुकीमुळे पक्ष वाढत नाही. त्यामुळे संबंधितांना पायउतार व्हावे लागेल,” असा इशारा दिला.
या कार्यक्रमाला प्रेमानंद देसाई, विशांत तळवडेकर, गोपाळ गवस, सुनिल गवस, तळेखोल सरपंच सौ. सावंत, कोलझर सरपंच सौ. गवस, झोळंबे सरपंच कु. विशाखा नाईक, कुडासे माजी सरपंच सौ. पुजा देसाई, सासोली सरपंच बळीराम शेटये, झरेबांबर सरपंच अनिल शेटकर, कुडासे-खुर्द उपसरपंच राजन गवस, स्वप्निल निंबाळकर, दादा देसाई, रामदास मेस्ञी, अमरसिंग राणे, भगवान गवस, राजेश नाईक, गुरुदास सावंत, राकेश धर्णे, सुर्यकांत गवस, विलास सावंत, उमेश सातार्डेकर, बबलू पांगम आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
