You are currently viewing साळगाव महाविद्यालयात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमावर प्रभावी मार्गदर्शन…

साळगाव महाविद्यालयात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमावर प्रभावी मार्गदर्शन…

*साळगाव महाविद्यालयात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमावर प्रभावी मार्गदर्शन…*

कुडाळ

परमपूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज महाविद्यालय, साळगाव येथे मंगळवार दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता महाविद्यालयीन राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.
सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य सेवा व आयुष्यमान आरोग्य मंदिर, साळगाव यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात कुष्ठरोगाबाबतचे समज-गैरसमज दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांना सखोल व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आरोग्य अधिकारी श्री. सुरेश असवले यांनी कुष्ठरोगाची लक्षणे, उपचार व प्रतिबंध याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सचिन पाटकर हे उपस्थित होते. याप्रसंगी समुदाय आरोग्य अधिकारी फॅन्सी डिसोजा, आरोग्य सेविका सुनंदा झारापकर, आरोग्य सेवक विष्णू तर्फे, सेविका रक्षंदा पाटकर तसेच मेरा युवा भारत – सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमास माय भारतचे माजी स्वयंसेवक सहदेव पाटकर, निरवडे ग्रामपंचायत सदस्य जयराम जाधव, अनुभव शिक्षा साथी श्रुती सावंत, नासिर मकानदार, पब्लिक रिलेशन अध्यक्षा फीझ्झा मकानदार, साळगाव पोलीस पाटील तुषार जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. स्वप्नाली सिंगनाथ यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. अंकिता नवार (NSS सहाय्यक विभाग प्रमुख) यांनी केले.
या उपक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य विषयक जनजागृतीसाठी हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. 🌿✨

प्रतिक्रिया व्यक्त करा