You are currently viewing मन व्याकुळ

मन व्याकुळ

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मन व्याकुळ*

 

होता विवाह लेकीचा

आसु हसुचा संगम

गेली पार दूर देशी

रिते आंगण मनाचे

 

उंच पुत्राचे उड्डाण

सोनं करिती संधीचे

रोज आभासी दर्शन

घर अबोल भिंतींचे

 

पत्नी जाता माहेराला

स्वप्न मनी स्वातंत्र्याचे

चार दिसाचं चांदणं

सुन्या, उदास घराचे

 

नावं शाळा-सोबत्यांची

पत्ते ठाव-ठिकाणांचे

ठरवुनी जमतात

कसे, काय बोलायाचे!

 

पती राखतसे सीमा

वारे वाहती युध्दाचे

होई चिंतित, अधीर

उरे सावट भयाचे

 

मायबाप आणि लेक

भिन्न गाव वास्तव्याचे

परस्परांनाही वाटे

स्पर्श व्हावेत मायेचे

 

काही कारणं, सबबी

जरी अंतर तनाचे

मन व्याकुळ व्याकुळ

वेध लागावे भेटीचे

 

@भारती महाजन-रायबागकर चेन्नई

©®या स्वरचित कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा