You are currently viewing गोष्टींची गोष्ट

गोष्टींची गोष्ट

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या लेखिका कवयित्री अंजली दीक्षित पंडित लिखित अप्रतिम लेख*

 

*गोष्टींची गोष्ट*

 

*’एकदा काय झालं’* म्हणून गोष्ट सांगायला सुरुवात केली की मग पऱ्यांच्या अलवार हव्याहव्याशा राज्यात, राक्षसांच्या अक्राळविक्राळ गुहेत, देवांच्या मोठमोठाल्या भव्यदिव्य प्रासादात, करवंदीच्या बोचऱ्या जाळीत, कधी उंच उंच पर्वत शिखरांवरच्या चमचमत्या बर्फात, बोलक्या प्राण्यांच्या विश्वात,अंधाऱ्या किट्ट काळोखाच्या गर्द झाडीत, जंगलात तर कधी भुताखेतांच्या गूढ काळ्या पडक्या वाड्यात… गोष्टींची जादुई सफर पिसासारखं मनाला हळुवार हलकं करून दूर दूर पर्यंत फिरवून आणते. आपल्यातलं मूल अगदी भाबडं होऊन डोळ्यात प्राण आणून या गोष्टी ऐकतं. जशी गोष्ट पुढे जाईल तसतसं कल्पनेतच जादुई जंगल उभं राहतं, मोठमोठे धबधबे त्यातले फेसाळ पाणी अंगावर येतं, कधी कधी मन मासळी होऊन सुळ्ळकन् पाण्यात जाऊन येतं तर कधी घशाला कोरड पडून थकून गेलेले पाय वाळवंटातल्या उष्ण उष्ण रेतीवर चटके सोसत अडखळत पडायला लागतात. गोष्टीतले हावभाव नितळ निरागस चेहऱ्यावर उमटायला लागतात. त्यातले राग लोभ, चिंता, बदला, हाणामारी, लागणं, पडणं,रडणं, माया, प्रेम, जिव्हाळा अशा कितीतरी भावभावनांची सुरेख साखळी तयार होते. आयुष्यात पुढे येऊ शकणाऱ्या भावनिक चढ उतारांची ओळखच करून देत असतील का या गोष्टी? कदाचित हो. एखादे जीवनमूल्य किंवा एखादा उदात्त विचार, उपदेश जर मुलांना सरळ शब्दात लागू पडत नसेल तर या मार्गाने तो हमखास पोहोचवला जाऊ शकतो. किंबहुना तो त्यांच्या सबकॉन्शियस माईंड मध्ये हलकेच घट्ट रुजवून देता येतो. ही सगळी गोष्टींमधली फॅन्टसी कितीही मोठं झालं तरी मनाला हवीहवीशी वाटते. अजूनही राजा राणीच्या राज्यात सर्व काही छान चाललं असताना होणारं परकीयांचं आक्रमण, राजकुमाराच्या शौर्यामुळे राज्यावरचं संकट टळलं तरी त्याला राजसिंहासनावर बसण्याचा अधिकार डावलला जाणं अशा कथा मनाला भुरळ घालतात आणि याच गोष्टींवर बेतलेली फिल्म करोडोंचा धंदा देखील करते.

 

असो, तो आपला विषय नाही,आज तरी. आपली गोष्ट आहे गोष्टींची. जादुई राज्यात रमलेली इवली इवली मनं गोष्ट संपली तरी त्यातनं बाहेर पडता पडत नाहीत. त्या गोष्टींचं गारुड मनावर तर चढतंच पण ते शरीरावरही चढतं. लहानपणी देहभान हरपून ज्यांना गोष्टी ऐकायला वाचायला मिळाल्या त्या मुलांचे भाव विश्व नक्कीच खूप दर्जेदार असेल, नाही का? या गोष्टी आपल्याला कुठे कुठे फिरवून आणतात. कधी बोट धरून हलके हलके पावले टाकायला शिकवतात, कधी मातीवरून चालताना पायाला टोचलेले खडे अंग किंचित मागे झुकवून पाय तिरका करून एका हाताने झटकायला लावतात, वाऱ्यावर भुरभुरणारे सोनेरी दाट रेशमी केस राजपुत्रासाठी खिडकीतून खाली टाकायला सांगतात, कधी खोल खोल समुद्राच्या तळाशी गेलेली अंगठी मासळीच्या पोटातून बाहेर काढायला लावतात …आणखी खूप काही. विशेष गंमत या गोष्टींची असते ती ही की हे सगळं आपल्या डोळ्यासमोर आत्ता अगदी ताजं ताजं घडतंय असंच ऐकणाऱ्याला वाटत राहतं. त्या मासेमाऱ्यांनं जाळ्यात पकडलेल्या मासळीची तडफड सुद्धा क्षणभर आपण अनुभवलेली असते. तिचा ओलसर गिळगिळीत स्पर्श आपल्या हाताला झालेला असतो. ही आपल्या मेंदूची अमूर्त दृश्य सुद्धा मूर्त करून पाहण्याची ताकद म्हणावी की सांगणाऱ्याच्या कथन शैलीलाच निर्विवाद श्रेय द्यावं? काहीही असो. कदाचित दोन्ही गोष्टींचा तितकाच तोलामोलचा ताळमेळ कारणीभूत असू शकतो. असच असावं. कारण देणारा देत असतो पण घेणाऱ्यानंसुद्धा ते तितकच उत्कटतेनं घेतलं तर सगळी गोष्ट जमून येणार. आणखी एक गंमत म्हणजे ऐकणाऱ्याला दरवेळी गोष्टीत काहीतरी नवीन हवं असतं किंवा आख्खी गोष्टच नवी ऐकायची असते. तशी ती सांगण्यापूर्वी पूर्वअटच घातली जाते म्हणा हवं तर. म्हणजे गोष्टी आयत्यावेळी तयार करून सांगणाऱ्याच्या कलेची तर हातोटीच सिद्ध होते. रंगवून रंगवून रसभरीत वर्णनासकट ऐकणाऱ्याला खिळवून ठेवणं आणि शेवटच्या क्षणाला अगदी अनपेक्षित कलाटणी देऊन गोष्टीतली उत्सुकता ताणून धरणं हा खरंच एक सुंदर कलाविष्कार आहे.

 

आपल्या मनानं सुंदर सुंदर गोष्टी तयार करून सांगणं कसं शक्य होत असेल बरं काही लोकांना? खरं तर त्यांची जबरदस्त निरीक्षण शक्ती या कामी खूपच उपयोगी पडत असते. कुठल्या कुठल्या बारीकसारीक गोष्टी नकळत मन:पटलावर नोंदवून घेतल्या जातात आणि मग उचित वेळ प्रसंग पाहून अपसूकच त्याची एक सुबक सुंदर अशी साखळी तयार होऊन ती गोष्ट रूपात सादर होत असते.तशी तर आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीत एक एक लाखमोलाची गोष्ट लपलेली आहे. वहीत ठेवलेल्या मोरपिसात, कच्च्या वहीच्या शेवटच्या पानावर, रुमालाच्या घडीत, कपाटातल्या स्वतःच्या कप्प्यात, आईच्या कुशीत, खेळण्यांच्या बॉक्समध्ये, अडगळीच्या खोलीत, बाबांच्या मायेतही आणि रागावण्यातही, खिडकीतून आत डोकावणाऱ्या उन्हाच्या सोनेरी कवडशांमधे, जुन्या माजघरातल्या खुंटीवर, तर कधी तारा मोडलेल्या गळक्या छत्रीत, मंदिराच्या घंटानादात, शाळेत,अंगणात, मऊ लुसलुशीत गवताच्या पात्यांमध्ये, झुळझुळ वाहणाऱ्या स्वच्छ नितळ झऱ्याच्या पाण्यात, वाऱ्याच्या गाण्यात, जंगली फुलांच्या उन्मादक गंधात, नक्षीदार जाळी पडलेल्या पिंपळाच्या पानात…… आणि असे कितीतरी मनाचे कप्पे उघडता येतील गोष्टींसाठी. अट एकच; फक्त तुमच्या आणि गोष्ट ऐकणाऱ्याच्या मनाच्या तारा जुळलेल्या असाव्यात तरी किंवा ऐकता ऐकता जुळाव्यात तरी. मग हा अनमोल खजिना हस्तेपरहस्ते एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे निःशंक पणे प्रवाहीत होत राहील आणि येणार्या पिढ्यांचं भावविश्व आणखीनच समृद्ध करत राहील, हो ना?

 

सौ. अंजली दीक्षित-पंडित

९८३४६७९५९६

 

*संवाद मिडिया*

 

😊 *”मनासारख लोकेशन”….विश्वास अन् “स्वतःच्या घराचे समाधान” देणारा वास्तुप्रकल्प – ||ज्ञानेश्वरी||*🏬

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

*बुकिंग सुर… बुकिंग सुरू…*📝

 

*मुंबई आणि चिपळूण मध्ये मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर 😇आता खास आपल्या गावी आपल्या माणसांच्या सेवेसाठी* 🏨

 

*मनासारख लोकेशन*….विश्वास अन् *स्वतःच्या घराचे समाधान* देणारा वास्तुप्रकल्प..

 

🏬 *D. D. S. Buildcon घेऊन आले..*🏬

 

🏨 _*||ज्ञानेश्वरी||*_🏨

 

*सुविधा :*

 

▪️बिल्डिंग नं. १ : दुकान गाळे + पार्किंग + ६ मजले

 

▪️बिल्डिंग नं. २ : पार्किंग + ७ मजले

 

▪️१ बीएचके, २ बीएचके, १ आरके फ्लॅटची सुविधा

 

▪️भूकंपरोधक बांधकाम

 

▪️पार्किंगमध्ये सौर ऊर्जांवर लाईट

 

▪️आकर्षक लॉबी

 

▪️लिफ्टची सोय

 

▪️ स्टील्ट पार्किंगमध्ये दोन रंगांमध्ये लादी

 

▪️पाण्याची 24 तास सोय

 

♦️ *उपक्रमाची वैशिष्ट्ये :*

 

▪️प्रत्येक इमारती समोर सीसीटीव्ही कॅमेरा

 

▪️अंतर्गत भुयारी गटारे

 

▪️वाहनतळ (स्टील्ट पार्किंग) सांडपाणी प्रक्रिया संयंत्र

 

👉 *१ आरके, १ बीएचके, २ बीएचके दुकानगाळे, ऑफिस उपलब्ध*🏬

 

🧾 *रेरा रजि नं. :* P52900048563

 

📧 *ई-मेल :* ddsbuildconpartner@gmail.com

 

🌐 *वेबसाईट :* www.ddsbuildcon.in

 

*प्रोप्रा. ज्ञानदेव सावंत*

 

📱 *संपर्क :* 9405671177 | 9405631177 | 8879181827

 

*पत्ता:* कुडाळ मार्केट व एसटी स्टँडच्या समोर चालत २ मिनिटाच्या अंतरावर तसेच रेल्वे स्थानकापासून १ किमी., ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + 18 =